मुंबईकरांनो, मास्क नाही तर प्रवेश नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2020 05:41 AM2020-09-30T05:41:17+5:302020-09-30T05:41:40+5:30
पालिकेचा नियम; रिक्षा, टॅक्सीसह कार्यालये, आस्थापना, मॉल्स, सोसायटी, सभागृह प्रवेशासाठी बंधनकारक
मुंबई : महापालिकेने केलेल्या दंडात्मक कारवाई आणि जनजागृतीनंतरही अनेक ठिकाणी नागरिक तोंडाला मास्क लावत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता मुंबईतील सर्व कार्यालये, आस्थापना, मॉल्स, सोसायटी, सभागृह आदी ठिकाणी मास्क न लावणाऱ्या लोकांना प्रवेश देऊ नये, असा नियम पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी केला आहे.
‘मास्क नाही, तर प्रवेश नाही; नो मास्क, नो एन्ट्री’ अशा आशयाचे फलकही बेस्ट बस, टॅक्सी, रिक्षा आदी ठिकाणी लावण्यात येत आहे.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी अन्य उपाययोजनांबरोबरच तोंडाला मास्क लावणे महापालिकेने अनिवार्य केले आहे. मास्क न लावणाºया लोकांकडून दोनशे रुपये दंड वसूल करण्यात येतो. काही ठिकाणी ही कारवाई पोलिसांचा दंडुका दाखवूनही करण्यात आली. मात्र, गेल्या महिन्यापासून मास्क न लावून अथवा चुकीच्या पद्धतीने मास्क लावून सार्वजनिक ठिकाणी फिरणाºया लोकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे ‘मास्क नाही, तर प्रवेश नाही’ असा निर्णय पालिकेत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडलेल्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या बैठकीत मंगळवारी घेण्यात आला.
मास्क न वापरणाºया लोकांवरील दंडात्मक कारवाई अधिक तीव्र करण्याचे निर्देश आयुक्तांनी बैठकीत दिले.
आतापर्यंत आकारला ५२ लाखांचा दंड
च्९ एप्रिलपासून महापालिकेने तोंडाला मास्क न लावणाºया लोकांवर दंडात्मक कारवाईला सुरुवात केली. सुरुवातीला एक हजार रुपये असलेला दंड आता कमी करून दोनशे रुपये केला आहे.
च्एप्रिल ते २६ सप्टेंबरपर्यंत १४,२०७ लोकांवर दंडात्मक कारवाई करीत ५२ लाख ७६ हजार दोनशे रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.