शेफाली पंडित- परब ।मुंबई : अखेर महापालिकेने पाणीकपात जाहीर केली आहे़ पाण्याची बचत कशी करावी, यासाठी पालिकेने नियमावली जारी केली आहे़ पेल्यातून पाणी प्या, पाहुण्यांना तांब्या-पेल्यातून पाणी द्या, असा सल्ला पालिकेने मुंबईकरांना दिला आहे़ ऐन उत्सव काळात अशा प्रकारे ग्लासाऐवजी पेल्यातूनच पाहुणचार करावा लागणार आहे़ यावर्षी तलाव क्षेत्रांकडे पावसाने पाठ फिरवल्यामुळे मुंबईकरांवर पाणीकपातीचे संकट ओढावले आहे. जुलै आणि आॅगस्ट महिन्यात चांगला पाऊस अपेक्षित असतो. मात्र पावसाचा जोर यंदा सुरुवातीपासूनच कमी असल्याने अखेर २० टक्के पाणीकपात लागू करण्यात येणार आहे. तसेच वर्षभर पाणीपुरवठा होण्यासाठी पालिका प्रशासनाने पाणी बचतीची नियमावली जाहीर केली आहे.
पाण्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी काटकसर पाण्याची; आपल्या सर्वांच्या उन्नतीची, बचत करूया पाण्याची; उन्नती साधण्या सर्वांची, थेंबे थेंबे साचे तळे; असे विविध पाणी बचतीच्या घोषवाक्य केले आहे.अशा आहेत पाणी बचतीसाठी सूचनाच्पाणी पिण्यासाठी लहान आकाराचे पेले (ग्लास) वापरा, पाहुण्यांना तांब्या-पेल्याने पाणी द्या.च्वाहने न धुता ओल्या फडक्याने पुसून घ्या, घरातील इतर कामे करताना, दात घासताना, दाढी करताना पाण्याचा नळ बंद ठेवा.च्गळके नळ, जलवाहिन्या त्वरित दुरुस्त करून घ्या, वाहत्या नळाखाली कपडे-भांडी धुऊ नका, आंघोळ करताना शॉवर सतत सुरू ठेवू नका, पाण्याच्या टाक्या वाहू देऊ नका, त्यांना बॉलकॉक बसवा...च्नळाखाली बादली भरत ठेवून पाणी वाहू देऊ नका, आदल्या दिवशीचे पाणी शिळे समजून फेकू नका, नळ पूर्ण उघडू नका. गॅलरी, व्हरांडा व लादी धुण्याऐवजी ओल्या फडक्याने पुसून घ्या!च्भूजलाची पातळी सुधारण्यासाठी वृक्षारोपण करा, झाडांसाठी गरजेपेक्षा जास्त पाण्याचा वापर करू नका, वर्षा संचयन व विनियोगाच्या पद्धतींचा वापर करा.