Join us

मुंबईकरांनो पालिकेच्या अर्थसंकल्पात व्हा सहभागी आपल्या सूचना मांडा

By जयंत होवाळ | Published: January 16, 2024 6:57 PM

२०२४-२५ या वर्षाकरीता महानगरपालिकेच्या उत्पन्न व खर्चाचे अर्थसंकल्पीय अंदाज तयार करण्याचे काम सुरु आहे

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी तयार करण्यात येत असलेल्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये लोकसहभाग असावा, यासाठी महानगरपालिका प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी आपल्या सूचना bmcbudget.suggestion@mcgm.gov.in या ई मेलवर २३ जानेवारी २०२४ पर्यंत पाठवाव्यात, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

२०२४-२५ या वर्षाकरीता महानगरपालिकेच्या उत्पन्न व खर्चाचे अर्थसंकल्पीय अंदाज तयार करण्याचे काम सुरु आहे. अर्थसंकल्पीय अंदाज ५ फेब्रुवारी, २०२४ रोजी वा तत्पूर्वी सादर करणे बंधनकारक आहे. या अनुषंगाने, लोकसहभागाच्या दृष्टीने नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे तसेच ज्या नागरिकांना लेखी सूचना पाठवावयाच्या असतील त्यांनी २३ जानेवारी २०२४ पर्यंत सायंकाळी ४ वाजेपर्यंत पाठवाव्यात.सूचना या पत्त्यावर पाठवा- प्रमुख लेखापाल (वित्त) यांचे कार्यालय, चौथा मजला, विस्तारीत इमारत, मुंबई महानगरपालिका मुख्यालय, महानगरपालिका मार्ग, फोर्ट, मुंबई – ४०० ००१

टॅग्स :मुंबईअर्थसंकल्प 2023