मुंबईकरांची ‘पूलकोंडी’; पालिका पाडणार २९ धोकादायक पूल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2019 04:24 AM2019-06-05T04:24:37+5:302019-06-05T04:24:55+5:30

नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य; पादचारी, वाहतूक पुलांचाही समावेश

Mumbaikar's 'pool kondi'; 29 dangerous pools to demolish the municipality | मुंबईकरांची ‘पूलकोंडी’; पालिका पाडणार २९ धोकादायक पूल

मुंबईकरांची ‘पूलकोंडी’; पालिका पाडणार २९ धोकादायक पूल

Next

मुंबई : फोर्ट येथील हिमालय पुलाच्या दुर्घटनेनंतर भविष्यात दुर्घटना घडून नाहक बळी जाऊ नयेत यासाठी महापालिकेने कंबर कसली आहे. पालिकेने परीक्षण करत २९ पुलांचे पाडकाम व पुनर्बांधणीचे काम हाती घेतले आहे. २९ पुलांपैकी आतापर्यंत ८ पूल पाडण्यात आले असून १२ पुलांचा वापर पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. लवकरच ते पूलही पाडण्यात येणार आहेत. तर उर्वरित ९ पूल लवकरच बंद करून ते पाडण्यात येतील. मात्र महापालिकेने ऐन पावसाळ्यात या कामाला सुरुवात केल्याने मुंबईकरांची कोंडी होण्याची शक्यता आहे.

मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत ३४४ पूल आहेत. यापैकी ३०४ पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट प्रगतिपथावर आहे. परीक्षणानुसार २९ पूल धोकादायक असल्याचे निदर्शनास आले आहे. यामध्ये पादचारी पुलांसह वाहतूक पुलांचाही समावेश आहे. मुंबईकरांच्या सुरक्षेला प्राधान्य देत महापालिकेने या पुलांचे निष्कासन व पुनर्बांधणीचे काम हाती घेतले आहे. या कामादरम्यान मुंबईकरांना कमीतकमी त्रास व्हावा, याचेही नियोजन महापालिकेच्या स्तरावर करण्यात येत आहे.

या पुलांचे निष्कासन व पुनर्बांधणीचे काम मुंबई महापालिकेच्या पूल खात्याद्वारे रात्रंदिवस पद्धतीने करण्यात येत आहे. जेणेकरून पुलासंदर्भातील सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण होऊन येथील वाहतूक सुरळीत होऊ शकेल, असे पूल खात्याचे प्रमुख अभियंता संजय दराडे यांनी सांगितले.

महानगरपालिकेच्या अखत्यारीत ३४४ पूल
मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत एकूण ३४४ पूल आहेत. ऑक्टोबर २०१६ ते ऑगस्ट २०१८ या कालावधीदरम्यान २९६ पुलांचे संरचनात्मक परीक्षण करण्यात आले. परीक्षण करताना नुकतेच बांधलेले, हस्तांतरित झालेले ४८ पूल वगळता उर्वरित २९६ पुलांचे परीक्षण करण्यात आले. या परीक्षणाअंती १४ पूल धोकादायक असल्याचे आढळले.

ऑक्टोबर २०१६ ते ऑगस्ट २०१८ दरम्यान पहिल्या परीक्षणादरम्यान धोकादायक असल्याचे आढळून आलेले १४ पूल व दुसऱ्या परीक्षणादरम्यान धोकादायक असल्याचे आढळून आलेले पूर्व व पश्चिम उपनगरातील १५ पूल यानुसार एकूण २९ पूल धोकादायक असल्याचे आढळून आले आहे.

हिमालय पूल दुर्घटनेनंतर महापालिकेच्या अखत्यारीतील ३०४ पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये पूर्व उपनगरातील ६६ तर पश्चिम उपनगरातील १५७ यानुसार आतापर्यंत २२३ पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट नव्याने करण्यात आले. यात १५ पूल धोकादायक आढळले. मुंबई शहरात नवीन संरचनात्मक परीक्षक नेमण्याची निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. शहरातील ८१ पुलांच्या संरचनात्मक परीक्षणासाठी नवीन संरचनात्मक परीक्षकांची नेमणूक करण्यात आली. २९ पुलांपैकी ३ पुलांच्या पुनर्बांधणीचे कार्यादेश यापूर्वीच देण्यात आले आहेत. ७ पुलांची माहिती स्थायी समितीला देण्यात आली आहे. ५ पुलांबाबत निविदा प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे.

 

पूलप्रकार सद्यस्थितीपूल प्रकारसद्यस्थिती
यल्लो गेट पूलपादचारीपाडलाप्रेम नगर नाला, एस.व्ही. रोड,वाहतूकबंद करणार
महर्षी कर्वे रोड, चंदनवाडी (द.)पादचारीपाडलाबाटा शोरूम, मालाड
गांधी नगर, कुरार व्हिलेज पूल
वाहतूकबंद
महर्षी कर्वे रोड, चंदनवाडी (उ.)पादचारीपाडलाओशिवरा नाला, एस.व्ही. रोडवाहतूकबंद करणार
वाकोला नाल्यावरील हंस भुग्रा
मार्गावरील पूल
वाहतूककार्यवाहीपिरामल नाला, लिंक रोडवाहतूकबंद
हंस भुग्रा मार्ग,
पाइपलाइन सर्विस रोड पूल
वाहतूकबंदचंदावाडकर नाला १२० फूट लिंक रोड, मालाडवाहतूकबंद
जुहू तारा रोड पूलवाहतूकवापरातफॅक्टरी लेन, बोरीवलीवाहतूक बंद करणार 
धोबी घाट, मज्जास नाला पूल
वाहतूक
बंदएस.बी.आय. कॉलनी,
वैभव को-ऑप. हा.सो.लि.
वाहतूकबंद
मेघवाडी नाला, श्यामनगरवाहतूकबंद करणाररतन नगरपासून दौलत नगर पूलवाहतूकबंद
वांद्रे-धारावी रोड पूलवाहतूकबंद करणारखैरानी रोडवरील
हरी मशीद नाल्यावरील पूल
वाहतूकपाडला
बिहारी टेकडी ब्रिजवाहतूकबांधकाम कार्यवाहीरमाबाई पाडा गुरुनानक नगर,
मुलुंड कॉलनी
पादचारीपाडला
वालभट्ट नाला येथील पूल, वालभट्ट रोड, गोरेगाव (पूर्व)वाहतूकबंदसंत मुक्ताबाई हॉस्पिटलजवळील, बर्वे नगरपादचारीपाडला
विठ्ठल मंदिर, ईरानी वाडी
येथील पूल, रगडा पाडा
वाहतूकबंदपॅन्थर नगरजवळ, विक्रोळी (पू.)वाहतूकबंद करणार
एस.व्ही.पी. रोड, कृष्ण कुंज
बिल्डिंगजवळील पूल
वाहतूकबंदरेनीसन्स हॉटेलजवळील पूल, पवईपादचारीपाडला
आकुर्ली रोड येथील पूल,
हनुमान नगर, धर्मराज डेरीजवळ
वाहतूकबंदलक्ष्मी बाग कल्वर्ट
नीलकंठ नाला पूल, घाटकोपर 
वाहतूकबंद


 

Web Title: Mumbaikar's 'pool kondi'; 29 dangerous pools to demolish the municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई