मुंबई : आरामदायी आणि सुरक्षित प्रवासासाठी मुंबईकर एसी लोकलला पसंती देत आहेत. एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यात मध्य रेल्वे मार्गावर तब्बल एक कोटी ३१ लाख ८४ हजार प्रवाशांनी एसी लोकलने प्रवास केला आहे. यातून मध्य रेल्वेला ६० कोटी २३ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे.
गेल्या वर्षी ५ मे पासून एसी लोकलच्या तिकिट दरात ५० टक्के कपात करण्यात आली. तेव्हापासून एसी लोकलची प्रवासी संख्या मोठ्या संख्येने वाढत आहे. गेल्या वर्षी एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यान एका एसी लोकलमधून ७२७ प्रवासी प्रवास करीत होते. आता हीच संख्या एक हजार १०५पर्यत पोहोचली आहे. गेल्या वर्षी एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यान ८७ लाख ६१ हजार २४५ प्रवाशांनी एकी लोकलने प्रवास केला होता. यंदा १ कोटी ३१ लाख ८४ हजार प्रवाशांनी एसी लोकलने प्रवास केला.एप्रिल ते नोव्हेंबर प्रवासी संख्या आणि उत्पन्न -प्रवासी----------२०२२-२३-----------२३-२४एकूण प्रवासी---------८७.६१लाख----------१कोटी ३१ लाख ८४ हजारएकूण उत्पन्न--------३९कोटी ४३ लाख------------६०कोटी २३ लाखमहिन्याची प्रवासी संख्या--------१०लाख ९५ हजार--------१६ लाख ४८ हजारमहिन्याचे उत्पन्न---------------४ कोटी ९२ लाख-----------७ कोटी ५३ लाख
महिन्यानुसार प्रवाशांची संख्या -महिना-------------२०२२-२३----------------२०२३-२४एप्रिल----------५,९२,८३६-------------१५,०२,८३९मे-----------८,३६,७००-------------१७,३४,९५९जून--------११,०३,९६९------------१६,९८,३१९जुर्ले----------१०,७९,०५०-------------१५,४०,५१७ऑगस्ट-------१२,३७,५७९---------१६,६०,०५८सप्टेंबर-------१३,८२,८०६---------१५,५९,३२६ऑक्टोबर------१२,७४,४०९----------१७,९३,४९९ नोव्हेंबर------१२,५३,८९६---------१६,९४,८०२एकुण-------८७,६१,२४५--------------१,३१,८४,३१९