मुंबईकरांची गारेगार प्रवासाला पसंती; दररोज एसी लोकलच्या ९६ फे-या चालवल्या जातात
By सचिन लुंगसे | Published: April 18, 2024 08:05 PM2024-04-18T20:05:48+5:302024-04-18T20:05:55+5:30
पश्चिम रेल्वे मार्गावर दररोज एसी लोकलच्या ९६ फे-या चालविल्या जात आहेत. तर शनिवारी आणि रविवारी ५३ फे-या चालविल्या जात आहेत.
मुंबई : मुंबईच्या कमाल तापमानाने नागरिकांना घाम फोडला असून, भर उन्हातला प्रवास गारेगार व्हावा म्हणून रेल्वे प्रवाशांकडून आता एसी लोकला प्राधान्य दिले जात आहे. विशेषत: एप्रिल, मे सारख्या उन्हाळी महिन्यांत एसी लोकलने प्रवास करणा-या रेल्वे प्रवाशांत भरच पडत असून, १ ते १५ एप्रिलपर्यंत पश्चिम रेल्वे मार्गावर २० लाख ६१ हजार ९८३ प्रवाशांनी एसी लोकलने प्रवास केला आहे. दरम्यान, दरदिवशी एसी लोकलने प्रवास करणा-या प्रवाशांची संख्या सुमारे दिड ते सव्वा लाखांच्या घरात आहे.
पश्चिम रेल्वे मार्गावर दररोज एसी लोकलच्या ९६ फे-या चालविल्या जात आहेत. तर शनिवारी आणि रविवारी ५३ फे-या चालविल्या जात आहेत.
१५ एप्रिल २०२४ पर्यंत
२०२३/२४
विभाग / तिकिट / प्रवासी
दिवस / २०,०३३ / ५९,५५१
महिना / २,७२,९८६ / १४,९०,३०४
२०२४/२५
विभाग / तिकिट / प्रवासी
दिवस / ३२,७११ / २,३९,१८३
महिना / ३,७३,५०२ / २०,६१,९८३
एप्रिल महिन्यातील एसीचे प्रवासी
दिनांक / तिकिट / प्रवासी
१ / २७,१८४ / २,३९,०९७
२ / २४,८८९ / १,५९,३३४
३ / २५,४८८ / १,४३,६१७
४ / २६,४०९ / १,६६,१३४
५ / २८,८४९ / १,३७,९१७
६ / २१,७२१ / ७७,०१०
७ / १४,५८८ / ८०,५७६
८ / २९,४०० / १,८४,९७५
९ / २०,०९८ / ८६,७५५
१० / २८,५२० / १,३७,९६३
११ / २४,०८५ / १,१६,५३२
१२ / ३१,०८८ / १,३०,३१५
१३ / २१,६९७ / ६८,५०६
१४ / १६,७७५ / ९४,०६९
१५ / ३२,७११ / २,३९,१८३
एकूण / ३,७३,५०२ / २०,६१,९८३