सत्तेची खुर्ची डळमळीत झाल्याने मुंबईकरांची आठवण - शेलार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2022 08:28 AM2022-01-03T08:28:38+5:302022-01-03T08:28:50+5:30

आतापासून नव्हे तर वचन दिले त्या तारखेपासून मालमत्ता कर माफ केला पाहिजे. त्यामुळे चार वर्षांचा करही  मुंबईकरांना परत करा, अशी मागणी भाजप नेते आ. आशिष शेलार यांनी केली आहे.

Mumbaikars remember after the shaking of the seat of power - Ashish Shelar | सत्तेची खुर्ची डळमळीत झाल्याने मुंबईकरांची आठवण - शेलार

सत्तेची खुर्ची डळमळीत झाल्याने मुंबईकरांची आठवण - शेलार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 
मुंबई : सत्तेची खुर्ची डळमळीत झाली म्हणून शिवसेनेला मुंबईकरांची आठवण झाली आहे. ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णयाला उशीर झाला आहे. आतापासून नव्हे तर वचन दिले त्या तारखेपासून मालमत्ता कर माफ केला पाहिजे. त्यामुळे चार वर्षांचा करही  मुंबईकरांना परत करा, अशी मागणी भाजप नेते आ. आशिष शेलार यांनी केली आहे.

सरकारने विलंबाने घेतलेल्या या निर्णयाचा समाचार घेताना आमदार शेलार म्हणाले की, सरकारच्या तिजोरीत खडखडाट होता तरीही प्रथम बिल्डरांना प्रिमियममध्ये ११ हजार कोटींची सूट दिली. बार, पब, रेस्टॉरंटना लायसन्स फीमध्ये सवलत दिली. विदेशी दारूला करात ५० टक्के सूट दिली. वायनरींवर पण सवलतींची खैरात झाली. मग मुंबईकरांच्या निर्णयाला का विलंब झाला, असा प्रश्न शेलार यांनी केला.
मुंबईतील अतिश्रीमंत सोडून ज्या मध्यमवर्गीयांची घरे ५०० चौ. फुटापेक्षा मोठी आहेत, त्यांचाही ५०० चौ. फुटापर्यंतचा कर माफ करा, अशी मागणीही त्यांनी केली.

 ‘आशिष शेलारांनी सुपारी उचलली आहे ’
nआशिष शेलार यांच्या टीकेला महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. शेलार यांनी मुंबईकरांची दिशाभूल करण्याची सुपारी उचलली आहे. आम्ही मुंबईकरांना चांगल्या गोष्टी देत बांधिलकी पाळत आहोत आणि हीच त्यांची पोटदुखी असल्याचे सांगत विरोधकांच्या टीकेला उत्तर दिले आहे.

nमुळात ही त्यांची पोटदुखी आहे. आज आपण मुंबईकरांना इतके चांगले देण्याचा प्रयत्न करत आहोत. आधी त्यांना वाटले हे होणारच नाही आणि आता शक्य झाले आहे तर कुठे ना कुठे भांडणे लावायची व मुंबईकरांची दिशाभूल करण्याच्या कामाची शेलार यांनी सुपारी उचलली आहे, असे त्या म्हणाल्या

Web Title: Mumbaikars remember after the shaking of the seat of power - Ashish Shelar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.