मुंबई : शनिवारी मुंबईचे किमान तापमान १८.४ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले असून, राज्यात सर्वात कमी किमान तापमान नाशिक येथे १३ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. मुंबईचे किमान तापमान शुक्रवारी १९ अंश नोंदविण्यात आले होते. शनिवारी यात एका अंशाची घसरण झाली आहे. किमान तापमान १८.४ अंश सेल्सियसवर आले. किमान तापमानात अंशाची घसरण झाल्याने, मुंबईकरांना गुलाबी थंडीचा अनुभव येत आहे.मुंबईचे किमान तापमान कमी झाल्याने मुंबईत पहाटेसह रात्री गार वारे वाहू लागले आहेत. गेल्या २४ तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली. कोकण, गोव्याच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागांत किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे.दोन दिवस मुंबईचे किमान तापमान १८ अंशचमध्य महाराष्ट्रात ९ डिसेंबर रोजी तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण, गोवा, मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे राहील. १० आणि १२ डिसेंबर रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडे राहील. ९ आणि १० डिसेंबर रोजी मुंबई आणि आसपासच्या परिसरातील आकाश मुख्यत: निरभ्र राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३२, १८ अंशाच्या आसपास राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
मुंबईकरांना गुलाबी थंडीची चाहूल; किमान तापमान १८.४ अंश सेल्सिअस
By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2018 6:19 AM