Join us

मलेरिया आणि डेंग्यूने मुंबईकर झाले हैराण; ‘डासांची उत्पत्तीस्थाने निर्माण होणे रोखा’

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2023 5:48 AM

महापालिकेने, तसेच वैद्यकीय तज्ज्ञांनी  आजूबाजूच्या परिसरात डासांची उत्पत्ती स्थळे निर्माण होणार नाहीत, याची काळजी घेण्याचे  आवाहन नागरिकांना केले आहे.

मुंबई :  गेल्या दोन महिन्यांच्या साथीच्या आजाराच्या रुग्णांची आकडेवारी पाहिली तर लक्षात येते की, कीटकजन्य आजाराचा मुंबईला विळखा कायम असल्याचे दिसून आले आहे. त्यामध्येही मलेरिया आणि डेंग्यू आजाराचे रुग्ण ऑगस्ट महिन्यापेक्षा सप्टेंबर महिन्यात अधिक असल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीतून दिसत आहे. त्यामुळे महापालिकेने, तसेच वैद्यकीय तज्ज्ञांनी  आजूबाजूच्या परिसरात डासांची उत्पत्ती स्थळे निर्माण होणार नाहीत, याची काळजी घेण्याचे  आवाहन नागरिकांना केले आहे.  

सध्या मुसळधार पावसाचा जोर कमी असला, तर शहराच्या विविध भागांत सकाळ-संध्याकाळ रिमझिम सुरू आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते हे डासांसाठी खूप अनुकूल असते. त्यामुळे काही ठिकाणी पाण्याची डबकी साचून त्यामध्ये डासांची उत्पत्ती होते. त्या डासांच्या चाव्यामुळे नागरिकांना मोठ्या मलेरिया आणि डेंग्यू संसर्ग होत असल्याचे चित्र सध्या शहरात पाहायला मिळत आहे.

मलेरिया

ऑगस्ट  - १,०८०

सप्टेंबर - १,३१३

लेप्टो 

ऑगस्ट  - ३०१

सप्टेंबर - ७३

डेंग्यू

ऑगस्ट  - ९९९

सप्टेंबर - १,३६०

गॅस्ट्रो

ऑगस्ट  - ९४८

सप्टेंबर - ५७३

हेपेटायटिस

ऑगस्ट  - १०३

सप्टेंबर - ६३

चिकनगुनिया

ऑगस्ट  - ३५

सप्टेंबर - ३१

स्वाइन फ्लू

ऑगस्ट  - ११६

सप्टेंबर – १८

विशेष म्हणजे, ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत सप्टेंबर महिन्यात लेप्टो, गॅस्ट्रो, चिकनगुनिया, हेपेटायटिस आणि स्वाइन फ्लूचे रुग्ण कमी प्रमाणात आढळून आले आहे.