तीन तासांच्या पावसाने उडाली मुंबईकरांची झोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:05 AM2021-07-19T04:05:54+5:302021-07-19T04:05:54+5:30

मुंबई : शनिवारी मध्यरात्री बारा वाजल्यापासून रविवारी पहाटे तीन वाजेपर्यंत मुंबई शहर आणि उपनगरात कोसळलेल्या २३४.९ मिलिमीटर पावसाने ...

Mumbaikars sleep deprived after three hours of rain | तीन तासांच्या पावसाने उडाली मुंबईकरांची झोप

तीन तासांच्या पावसाने उडाली मुंबईकरांची झोप

Next

मुंबई : शनिवारी मध्यरात्री बारा वाजल्यापासून रविवारी पहाटे तीन वाजेपर्यंत मुंबई शहर आणि उपनगरात कोसळलेल्या २३४.९ मिलिमीटर पावसाने मुंबईकरांची झोप उडाली. रात्रभर कोसळत असलेल्या पावसामुळे मुंबईतल्या सखल भागात पावसाचे पाणी साचले होते. शिवाय बहुतांश नागरिकांच्या घरातदेखील पाणी शिरल्याने संबंधितांचे आर्थिक नुकसानदेखील झाले.

मुंबईत रात्रभर पाऊस कोसळत असतानाच हिंदमाता, सायन रोड नंबर २४, गांधी मार्केट, वडाळा चर्च, सक्कर पंचायत चौक, नायर रुग्णालय, संगमनगर वडाळा, मडकेबुवा चौक, शीतल सिनेमा, शेल कॉलनी, आरसीएफ कॉलनी, अंजनाबाई नगर, अणुशक्ती नगर, कुर्ला आगार, शेरे पंजाब कॉलनी, मानखुर्द रेल्वे स्थानक, नेहरू नगर, स्वस्तिक चेंबर्स, कल्पना सिनेमा, टेंबी ब्रीज, वांद्रे, साईनाथ सबवे, मिलन सबवे, अंधेरी मार्केट, दहिसर सबवे, वांद्रे टॉकिज, वीरा देसाई रोड, वाकोला ब्रीज येथे पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर साचले होते. त्यामुळे वाहतुकीचे मार्ग वळविण्यात आले होते.

शनिवारी रात्री बारा वाजता सुरू झालेल्या पावसादरम्यान वेगाने वारे वाहत होते. शिवाय विजाही चमकत होत्या. मेघगर्जनेचे प्रमाण कमी असले तरी वारा मोठ्या वेगाने वाहत होता. रविवारी दिवसभर देखील मोठ्या प्रमाणावर वारा वाहत होता. शनिवारी रात्री जोर पकडलेल्या पावसाने पहाटे तीन वाजता मात्र आपला मारा कमी केला होता. मात्र, या काळात चाळी, झोपड्या, इमारतींचे पहिले माळे अशा सर्वच ठिकाणी गुडघ्याएवढे पाणी साचले होते आणि पावसाचा वेग कमी होत नसल्याने मध्यरात्री मुंबईकरांना भरलेली धडकी सकाळीदेखील कायम होती. दरम्यान, पावसाचा मारा सुरू असतानाच ११ ठिकाणी बांधकामांचा भाग कोसळला. १३ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. नऊ ठिकाणी झाडांच्या फांद्या कोसळल्या.

Web Title: Mumbaikars sleep deprived after three hours of rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.