मुंबई : मंगळवारी रात्री आकाशात नागरिकांना गुरू, शनी आणि चंद्र एकत्र पाहण्यास मिळाले असून, आता गुरू आणि शनी एकाच जागी राहणार असले तरी चंद्र मात्र त्याची जागा बदलणार असून, एका महिन्याने पुन्हा हे तिघे नागरिकांना एकत्र पाहण्यास मिळतील.सर्वांत महत्त्वाचे म्हणजे लॉकडाउनच्या काळात घरात बसलेले मुंबईकर कोरोनाला हरवितानाच विज्ञानाशी निगडित विविध प्रयोग करीत असून, अवकाश निरीक्षणही करीत आहेत. १६ मे रोजीच्या आकाशात चंद्र, गुरू आणि शुक्र यांची युती होईल, असा मेसेज समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. याची पडताळणी करण्यासाठी वरळी येथील नेहरू विज्ञान केंद्राशी संपर्क साधला असता केंद्राने सांगितले की, चंद्र, गुरू आणि शुक्र यांची अशी काहीही युती वगैरे होणार नाही.नेहरू विज्ञान केंद्राच्या शिक्षण साहाय्यक शीतल चोपडे यांनी सांगितले की, चंद्र, गुरू आणि शुक्र यांची युती होऊ शकते. मात्र ती १६ मे रोजी होणार नाही. समाज माध्यमांवर जे मेसेज फिरत आहेत; त्यात काही तथ्य नाही.आजघडीला शुक्र सायंकाळचा तारा आहे. त्यास आपण इव्हिनिंग स्टार असे म्हणू शकतो. रात्री नऊच्या सुमारास तो मावळतो. त्यामुळे तो मध्यरात्री आकाशात दिसणे शक्यच नाही. गुरू ग्रह जवळपास मध्यरात्री साडेअकराच्या सुमारास उगवतो. १६ मे रोजी चंद्र रात्री उशिरा सव्वादोनच्या आसपास उगवणार आहे. त्यामुळे या दिवशी गुरू आणि चंद्र हे दोन्ही जरी आकाशात असले तरी त्यांच्यामध्ये अंतर असेल आणि सोबत शुक्र नसेल. त्यामुळे सांगितलेली युती होणे आणि हसरा चेहरा (स्माइली फेस) तयार होणे शक्य नाही. चंद्र, गुरू आणि शुक्र यांची युती होऊ शकत नाही, असे नाही. मात्र सध्या १६ मे रोजी असे काही होणार नाही. गुरू आणि शुक्र हे रात्रीच्या आकाशात ठळकपणे दिसणारे दोन ग्रह आकाशात सोबत येणे अतिशय दुर्मीळ आहे. दोन ते तीन वर्षांतून अशा घटना घडतात ज्या वेळी असे ग्रह एकत्र येतात. फेब्रुवारी २०२१ साली शुक्र आणि गुरू एकत्र येऊ शकतात. त्यामुळे समाज माध्यमांवर व्हायरल होत असलेल्या मेसेजमध्ये तथ्य नाही.समाजमाध्यमांवरील मेसेज तथ्यहीननेहरू विज्ञान केंद्राच्या शिक्षण सहायक शीतल चोपडे यांनी सांगितले की, चंद्र, गुरू आणि शुक्र यांची युती होऊ शकते. मात्र ती १६ मे रोजी होणार नाही. समाजमाध्यमांवर जे मेसेज फिरत आहेत; त्यात काही तथ्य नाही.