Join us  

मेगाब्लॉकमुळे मुंबईकर त्रस्त

By admin | Published: May 08, 2017 6:42 AM

मध्य, हार्बर आणि पश्चिम या तिन्ही मार्गावर घेण्यात आलेल्या मेगाब्लॉकमुळे प्रवासी त्रस्त झाल्याचे दिसून आले. रविवारी ११ ते ४ या वेळेत

मुंबई : मध्य, हार्बर आणि पश्चिम या तिन्ही मार्गावर घेण्यात आलेल्या मेगाब्लॉकमुळे प्रवासी त्रस्त झाल्याचे दिसून आले. रविवारी ११ ते ४ या वेळेत घेण्यात आलेल्या ब्लॉकनंतरही तिन्ही मार्गावरील लोकल लेटमार्कने सुरू होत्या. शिवाय गर्दीने तुडूंब भरलेल्या काही लोकलमधील पंखेदेखील बंद असल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला.मान्सूनच्या प्रतीक्षेत असलेल्या मुंबईकरांना पावसाळ््यात त्रास होऊ नये, म्हणून रेल्वे प्रशासन सज्ज आहे. परिणामी, मान्सूनमध्ये प्रवाशांना लेटमार्क’ लागणार नाही, असे चित्र मरेकडून उभे करण्यात येत आहे. मेन लाइनवरील माटुंगा ते मुलुंड डाउन फास्ट मार्गावर सकाळी १०.१५ ते दुपारी ३.१५ वाजेपर्यंत रेल्वेच्या दुरुस्ती आणि देखभालीचे काम करण्यात आले. या वेळेत बहुतांशी लोकल २० मिनिटांहून अधिक लेटमार्कने धावल्या. डाउन फास्टवरील वाहतूक स्लो मार्गावरून सुरू होती. त्यातच लांब पल्ल्याच्या गाड्यादेखील स्लो मार्गावरून चालवण्यात आल्याने, बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांनाही याचा फटका बसला.हार्बर मार्गावर ११ ते ४ वाजेपर्यंत हार्बर मार्गावर सीएसटी ते चुनाभट्टी दरम्यानची अप-डाउन मार्गावरील लोकल रद्द केल्यामुळे प्रवाशांनी रस्त्यावरील पर्यायी व्यवस्थेस पसंती दिली. यामुळे रस्त्यांवरही ‘ट्रॅफिक जाम’ झाल्याचे दिसून आले. दरम्यान,कुर्ला स्थानकातील फलाट क्रमांक ८ वरून पनवेलसाठी विशेष ट्रेन चालवण्यात आली. पश्चिम रेल्वेवरील सांताक्रुझ ते माहिमस्थानकादरम्यान घेतलेल्या ब्लॉकमुळे उपनगरीय काही लोकल रद्द करण्यात आल्या. परिणामी, सांताक्रुझ ते माहिमदरम्यान प्रवाशांची तोबा गर्दी उसळली.