मुंबई : देशासह राज्यात थंडीने चांगलाच जोर पकडला आहे़ थंडीने मुंबईकरांची रविवारची पहाटही गारेगार केली आहे. रविवारी मुंबईचे किमान तापमान १३.८ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आहे़ वाढत्या थंडीने मुंबईकर अक्षरश: कुडकुडले आहेत.विशेष म्हणजे, मुंबईत दिवसाही गार वारे वाहात असल्याने, मुंबईकर खºया अर्थाने हिवाळा अनुभवत आहेत. रविवारी नोंदविण्यात आलेले १३ अंश हे किमान तापमान या मोसमातील आतापर्यंतचे नीचांकी किमान तापमान आहे, अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामान खात्याकडून देण्यात आली.भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी कुलाबा वेधशाळेत किमान तापमानाची नोंद १७.५ अंश सेल्सिअस तर सांताक्रुझ वेधशाळेत किमान तापमानाची नोंद १३.८ झाली आहे. राज्यात सर्वात कमी किमान तापमान नाशिक येथे ८ अंश नोंदविण्यात आले आहे. कोकण, गोवा आणि विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे.मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागांत किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे. ८ ते ११ जानेवारी दरम्यान गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील. ८ आणि ९ जानेवारी रोजी मुंबईचे किमान तापमान १५ अंशाच्या आसपास राहील. आकाश मुख्यत: निरभ्र राहील, असाही अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.हुडहुडी भरली!; नाशिक नीचांकीकिमान तापमानात पुन्हा झपाट्याने घट झाल्याने राज्यात हुडहुडी जाणवू लागली आहे़ पुढील दोन दिवस गारठा असाच कायम राहणार आहे. रविवारी नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे सर्वात कमी ७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. वाढत्या थंडीमुळे द्राक्षांच्या मण्यांना तडे जाण्याची भीती आहे.नाशिक जिल्ह्यात सकाळी बोचरी थंडी जाणवते. खान्देशातही थंडीचा कडाका असून जळगावला ८़२ अंश सेल्सिअस तापमान होते. मुंबईकरांचा रविवारही गारेगार होता. रविवारी मुंबईचे किमान तापमान १३.८ अंश सेल्सिअस होते. दिवसाही गार वारे वाहत असल्याने मुंबईकर ख-या अर्थाने हिवाळा अनुभवत आहेत.
मुंबईकरांचा रविवार गारेगार; मोसमातील आतापर्यंत नीचांकी किमान तापमान, किमान तापमान १३ अंश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2018 3:42 AM