मुंबई : पवई येथील लेकफ्रंट सॉलिटेअर या रहिवासी संघटनेने आदिवासींच्या जीवनास मदत करण्याचे ठरविले. त्यानुसार रोपे वाटली गेली. आरे येथील आदिवासी आरे वन संवर्धनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. यापूर्वी जंगलातल्या प्रस्तावित प्रकल्पांच्या विरोधात मोठ्या संख्येने निषेधासाठी येऊन त्यांच्या जंगल जमीन वाचवण्यासाठी केलेल्या लढाईत आरेच्या आदिवासींचे समर्थन करणारे लोक पाहिले आहेत. परंतु, लेकफ्रंट सॉलिटेअरच्या रहिवाशांनी आदिवासींच्या जीवनामध्ये त्यांना मदत करुन त्यांना पाठिंबा देण्यासाठी एक नवीन मार्ग स्वीकारला आहे.
आजकाल आदिवासींसाठी कोरोनामुळे आणि नवीन सुरक्षा नियमांमुळे बाजारपेठेत जाऊन रोपांची विक्री करणे कठीण झाले आहे. त्यामुळे त्यांना एक छोटी मदत देखील दिलासा आहे. लेकफ्रंट सॉलिटेअर कचर्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करीत आहे. आता त्यांनी रोपट्यांसह त्यांनी त्यांच्या आवारात स्वयंपाकघरातील कचर्यापासून सेंद्रिय खत देखील वितरीत केले. आतापर्यंत त्यांनी सुमारे ५ टन स्वयंपाकघरातील कचरा डम्पिंग ग्राऊंडवरून वळवून त्याचे मौल्यवान खत (कंपोस्ट) मध्ये रूपांतरित केले, अशी माहिती संघटनेच्या रहिवासी डॉ. रुपाली खानोलकर यांनी दिली.