मुंबईकरांनो, तब्येतीची काळजी घ्या; घाबरू नका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:06 AM2021-05-18T04:06:32+5:302021-05-18T04:06:32+5:30

मुंबईकरांनो, तब्येतीची काळजी घ्या; घाबरू नका ! वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला; वादळामुळे वातावरणात बदल लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई - काही ...

Mumbaikars, take care of your health; Don't panic! | मुंबईकरांनो, तब्येतीची काळजी घ्या; घाबरू नका !

मुंबईकरांनो, तब्येतीची काळजी घ्या; घाबरू नका !

Next

मुंबईकरांनो, तब्येतीची काळजी घ्या; घाबरू नका !

वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला; वादळामुळे वातावरणात बदल

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई - काही दिवसांपूर्वी उकाड्यामुळे हैराण होणाऱ्या मुंबईकरांना अचानक वादळाला सामोरे जावे लागत आहे. तौक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल झाल्यामुळे याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची संभावना आहे. या वातावरणामुळे सर्दी, ताप, खोकला, दमा अशा आरोग्याच्या तक्रारी वाढण्याची शक्यता असल्याने मुंबईकरांनी घाबरून न जाता काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

सध्या मिश्र वातावरणाचा अनुभव घेतला जात आहे. हवामानातील हा बदल आरोग्यासाठी धोकादायक आहे. वातावरणात झालेल्या या बदलांमुळे साथीचे आजार वाढण्याची शक्यता जास्त असते. ताप, सर्दी, खोकला असे अनेक साथीचे आजार बळावतात. अंगदुखी, उत्साह नसल्यासारखे वाटणे, डोके दुखणे असे अनेक आजार उद्भवतात. अचानक वाढलेला उष्मा आणि थंडी आरोग्याला बाधक ठरत आहे. या आजारांवर वेळीच उपाय केले नाहीत, तर ते बळावण्याची शक्यता असते.

बदलत्या हवामानामुळे परागकण, बुरशीजन्य कण, धूळ अशा हवेतून पसरणाऱ्या काही गोष्टी मोठ्या प्रमाणात तयार होतात. त्यामुळे श्वसनसंस्थेमध्ये ॲलर्जी निर्माण होऊन दमा, सर्दी, खोकला, ब्रॉन्कायटिस, सीओपीडी, न्यूमोनिया असे आजार वाढीस लागतात. फिजिशिअन डॉ. संतोष धुमाळे म्हणाले, कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचे संकट असताना आता वातावरणातील बदलांमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती आहे. वातावरणातील बदलांमुळे शरीराचे तापमान स्थिर राहत नाही. त्यातून प्रतिकारशक्ती कमी होऊन, विषाणूंच्या संसर्गाचे प्रमाण वाढते. त्यामुळे शहरात सध्या थंडी, ताप, सर्दी, खोकला अशा रुग्णांचे प्रमाण वाढू शकते.

* लक्षणे जाणवल्यास वैद्यकीय सल्ला घ्या

वातावरणामुळे आजारांचा धोका आहे. त्यामुळे सर्दी, खोकला, ताप, अशक्तपणा अशा काही समस्या उद्भवल्यास अंगावर न काढता त्वरित वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्या. लवकरात लवकर निदान व उपचार केल्याने या आजारांना आळा घालता येऊ शकतो. या काळात आजाराचा अधिक धोका असणाऱ्या ज्येष्ठ नागरिक, गर्भवती, लहान मुलांची अधिक काळजी घेतली पाहिजे.

- डॉ. आकाश संघवी

* आजार टाळण्यासाठी महत्त्वाचे

• बाहेरचे खाणे टाळावे

• गरम पाणी प्यावे

• कुठलाही पदार्थ खाताना हात स्वच्छ धुऊन खावेत

• खोकताना, शिकताना नाका-तोंडावर रुमाल ठेवावा

• नित्याने व्यायाम करावा

• रोज मोकळ्या हवेवर फिरण्यास जावे

• आहारात ‘क’ जीवनसत्त्वयुक्त फळांचा समावेश करावा

• योग आणि प्राणायामाच्या माध्यमातून सर्दी, खोकला तसेच घशाच्या आजारांना दूर ठेवता येते

.............................................

Web Title: Mumbaikars, take care of your health; Don't panic!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.