Join us

मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा, पाणीकपातीचे ढग आणखी गडद

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2019 3:30 AM

मान्सूनचे विलंबाने झालेले आगमन, त्यानंतरही पावसाने घेतलेली ओढ आणि दिवसेंदिवस खालावत जाणारी पाण्याची पातळी या घटकांमुळे मुंबईकरांच्या पाण्याचे टेन्शन वाढले आहे.

मुंबई : मान्सूनचे विलंबाने झालेले आगमन, त्यानंतरही पावसाने घेतलेली ओढ आणि दिवसेंदिवस खालावत जाणारी पाण्याची पातळी या घटकांमुळे मुंबईकरांच्या पाण्याचे टेन्शन वाढले आहे. कारण मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांत केवळ जुलैअखेरपर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा आहे. महत्त्वाचे म्हणजे पावसाने पाठ फिरवली तर तलावांतील पाण्याची पातळी आणखी कमी होईल. त्यामुळे सद्य:स्थितीत मुंबईवरील पाणीकपातीचे ढग आणखी गडद होतील, असे चित्र तूर्त आहे.मुंबईला पाणीपुरवठा करणाºया तलावांतील राखीव साठ्यातून आता पाणीपुरवठा केला जात आहे. पाणीपुरवठ्याद्वारे मुंबईकरांना जुलैअखेर सुरळीत पाणीपुरवठा करता येईल, असे पालिकेचे नियोजन आहे. या वर्षीचा पावसाळा मुंबई व तलाव क्षेत्रांत अजूनही मोठ्या प्रमाणात सुरू झालेला नाही. परिणामी तलावात पाणीसाठा जमा होत नाही. महापालिकेने जरी जुलैअखेर पाणी पुरविण्याचे नियोजन केले असले तरी मुंबईकर नागरिकांनी पाणी जपून वापरावे.साठविलेले पाणी टाकून देऊ नये. त्याचा इतर उपयोगासाठी वापर करावा, असे आवाहन पालिकेने केले आहे.दरम्यान, मुंबईला पाणीपुरवठा करणाºया तलाव क्षेत्रातील पाणीसाठा कमी होत आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाºया तलावांत आता केवळ वीस दिवस पुरेल एवढाच साठा शिल्लक आहे. परिणामी, सरकारच्या भातसा आणि अप्पर वैतरणातून मुंबईसाठी दररोज अडीच हजार दशलक्ष लीटर राखीव पाणीसाठा वापरण्यास सुरुवात करण्यात आली आहे.रोज प्रतिमाणशी मिळते १३५ लीटर पाणीमुंबईला दररोज तीन हजार ८०० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो.तलाव क्षेत्रात गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस नाही.गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी चित्र आणखी विदारक आहे.पाणीसाठा कमी असल्याने पालिकेने नोव्हेंबर, २०१८ पासून दहा टक्के पाणीकपात सुरू केली आहे.भातसामधून दररोज दोन हजार दशलक्ष लीटर तर अप्पर वैतरणातून ५०० दशलक्ष लीटर पाणी महापालिका घेत आहे.मुंबईमध्ये प्रतिमाणशी दररोज दीडशे लीटर पाण्याची आवश्यकता आहे, परंतु सध्या १३५ लीटर पाणी प्रतिमाणशी मिळत आहे.दररोज विविध मार्गांनी २५ टक्के पाणी वाया जाते. प्रतिदिन १६.७ दशलक्ष लीटर एवढे पिण्यायोग्य पाणी वाहने धुण्यासाठी वापरले जाते.

टॅग्स :पाणी टंचाईमुंबई