मुंबईकरांना महापौर चषक स्पर्धेचे वेध

By admin | Published: April 17, 2017 03:52 AM2017-04-17T03:52:25+5:302017-04-17T03:52:25+5:30

क्रीडापटंूच्या पाठीशी सदैव राहू, या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी कामाला सुरुवात केली.

The Mumbaikars watch the Mayor Cup tournament | मुंबईकरांना महापौर चषक स्पर्धेचे वेध

मुंबईकरांना महापौर चषक स्पर्धेचे वेध

Next

मुंबई : क्रीडापटंूच्या पाठीशी सदैव राहू, या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी कामाला सुरुवात केली. मध्य उपनगरातील भांडुपमध्ये २० ते २३ एप्रिल या कालावधीत ३०वी खो-खो महापौर चषक आणि पश्चिम उपनगरातील कांदिवली येथे १९ आणि २० एप्रिल रोजी किकबॉक्सिंग महापौर चषक रंगणार आहे, तर कॅरम स्पर्धा २२ ते २३ एप्रिल रोजी कुर्ला येथे पार पडणार आहे.
मुंबई उपनगर खो-खो संघटना आणि महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने खो-खो महापौर चषकाचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत १६ पुरुष गट, ८ महिला गट, ८ व्यावसायिक गट अशा एकूण ३२ संघामध्ये विजेतेपदासाठी चुरस रंगणार आहे. भांडुप पश्चिमेकडील कोकणनगर बस स्थानकासमोरील महापालिका मैदानात स्पर्धा खेळवण्यात येणार आहे.
मुंबई उपनगर जिल्हा मानांकन पाचवी मुंबई महापौर चषक कॅरम स्पर्धा २२ आणि २३ एप्रिल रोजी पार पडणार आहे. कुर्ला पश्चिमेकडील न्यू मिल रोडवरील झुलेलाल भवनात ही स्पर्धा भरवण्यात येणार आहे. कांदिवली पूर्वेकडील साईमध्ये किकबॉक्सिंग महापौर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पॉइंट फाइट, लाइट कॉन्टक्ट, फुल कॉन्टक्ट या प्रकारात स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. (क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: The Mumbaikars watch the Mayor Cup tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.