मुंबईकरांचे पाणी टेन्शन मिटले; तलावांमध्ये एका आठवड्यात वाढला १७२ दिवसांचा जलसाठा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2021 08:27 PM2021-07-24T20:27:42+5:302021-07-24T20:29:26+5:30

Mumbai Water : सध्या ६३ टक्के जलसाठा जमा असल्याने पाणी टेन्शन मिटले आहे. आता २४२ दिवसांचा जलसाठा तलावांमध्ये असल्याने मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Mumbaikars' water tension eased; The water storage in the lakes increased by 172 days in one week | मुंबईकरांचे पाणी टेन्शन मिटले; तलावांमध्ये एका आठवड्यात वाढला १७२ दिवसांचा जलसाठा

मुंबईकरांचे पाणी टेन्शन मिटले; तलावांमध्ये एका आठवड्यात वाढला १७२ दिवसांचा जलसाठा

googlenewsNext

मुंबई - गेल्या आठवड्यात पाणी कपातीचे सावट मुंबईवर होते. मात्र मुसळधार पाऊस सतत बरसत असल्याने सात दिवसांतच तब्बल १७२ दिवसांचा जलसाठा प्रमुख तलावांमध्ये जमा झाला आहे. सध्या ६३ टक्के जलसाठा जमा असल्याने पाणी टेन्शन मिटले आहे. आता २४२ दिवसांचा जलसाठा तलावांमध्ये असल्याने मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये १७ जुलैपर्यंत जेमतेम १८ टक्के जलसाठा शिल्लक होता. मात्र मुसळधार पावसामुळे एकाच दिवसात तलावांमध्ये तब्बल १० ते १२ दिवसांचा जलसाठा वाढला. त्यानंतर आठवडाभर पावसाचा जोर कायम राहिला. परिणामी, मोडकसागर, तानसा, विहार आणि तुळशी हे चार प्रमुख तलाव भरून वाहू लागले आहेत. तर मध्य वैतरणा आणि भातसा या प्रमुख तलावांमध्ये ५५ टक्‍क्‍यांहून अधिक जलसाठा जमा झाला आहे. 

महापालिकेमार्फत दररोज तीन हजार ८५० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा केला जातो. वर्षभर पाणीपुरवठा सुरळीत राहण्यासाठी तलावांमध्ये १ ऑक्टोबर रोजी १४ लाख ४७ हजार दशलक्ष लिटर जलसाठा असणे आवश्यक असते. गेल्यावर्षी जुलै अखेरीस तलावांमध्ये सात लाख ८७ हजार ९४९ दशलक्ष लिटर जलसाठा जमा होता. तर २०२० मध्ये चार लाख ३५ हजार ९०८ जलसाठा होता.

२४ जुलै २०२१ रोजी
जलसाठ्याची आकडेवारी( मीटर्समध्ये )
तलाव..कमाल.. किमान ...उपायुक्त साठा (दशलक्ष)  सध्या

मोडक सागर १६३.१५   १४३. २६       १२८९२५  १६३.१५

तानसा    १२८.६३      ११८.८७      १४३७६९    १२८.५६

विहार    ८०.१२        ७३.९२        २७६९८.....८०.३३

तुळशी    १३९.१७        १३१.०७       ८०४६    ..१३९.२३

अप्पर वैतरणा ६०३.५१    ५९५.४४    ७८३६४...५९८.५७

भातसा    १४२.०७        १०४.९०      ४१४९८३ ...१२९.८०

मध्य वैतरणा २८५.००    २२०.००   १०६९७८   ..२६९.२८

 

Web Title: Mumbaikars' water tension eased; The water storage in the lakes increased by 172 days in one week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.