Join us

मुंबईकरांना मिळणार संकटग्रस्त वन्यजिवांची संपूर्ण माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2021 4:08 AM

मुंबईकरांना मिळणार संकटग्रस्त वन्यजीवांची संपूर्ण माहितीजागतिक वन्यजीव दिन; धारावीतील महाराष्ट्र निसर्ग उद्यानाचा पुढाकारलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ...

मुंबईकरांना मिळणार संकटग्रस्त वन्यजीवांची संपूर्ण माहिती

जागतिक वन्यजीव दिन; धारावीतील महाराष्ट्र निसर्ग उद्यानाचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात जंगलांचे प्रमाण कमी होत असले तरी वन्यजिवांची माहिती वन्यप्रेमींना आणि मुंबईकरांना मिळावी यासाठी धारावी येथील महाराष्ट्र निसर्ग उद्यानाने कंबर कसली आहे. उद्यानाच्या नव्या प्रकल्पानुसार उद्यानाच्या आवारातील भिंतींवर संकटग्रस्त वन्यजिवांची माहिती प्रदर्शित केली जात असून, या माध्यमातून वन्यजिवांचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासह नागरिकांपर्यंत त्यांची संपूर्ण माहिती पोहोचावी हा उद्देश आहे.

मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई या प्रदेशातील जंगलांचे वन्यजिवांना पाहण्यासाठी मुंबईबाहेर जावे लागते. मात्र, आता महाराष्ट्र निसर्ग उद्यान संस्थेमधील शैक्षणिक इमारत केंद्राच्या भिंतींवर संकटग्रस्त प्राणी, झाडांपासून मानवाला होणारे फायदे, अन्नसाखळी आणि अन्नजाळी, जलचक्र, झाडांच्या पानांचे भाग, पानांचे प्रकार, पावसाळी पाणी साठवणुकीचे महत्त्व आणि एनर्जी पिरॅमिड अशी निसर्गाशी निगडित चित्रे काढण्यात आली आहेत. ही सर्व चित्रे तानाजी जाधव यांनी काढली आहेत.

* निसर्गातील विविध पैलूंचा सोप्या पद्धतीने हाेणारा उलगडा

उद्यानास भेट देणाऱ्या अभ्यंगतांना निसर्गातील विविध पैलूंचा उलगडा सोप्या पद्धतीने व्हावा तसेच निसर्ग शिक्षण हे उद्यानाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र निसर्ग उद्यान संस्थेमधील शैक्षणिक इमारत केंद्राच्या भिंतींवर विविध चित्रे काढण्यात आल्याचे उद्यानाचे संचालक अशोक वाघाये यांनी सांगितले. भारतामधील संकटग्रस्त प्राणी कोणते आहेत? ते संकटग्रस्त का झाले आहेत? याची माहितीही या चित्रांतून मिळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

.............................