Join us

नीप टाइडही उडविणार मुंबईकरांची झोप, नऊ दिवस करावा लागणार सामना

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2019 4:27 AM

मुंबईतील पर्जन्य जलवाहिन्या ताशी सुमारे ५० मि.मी. पावसाचे पाणी वाहून नेत आहेत.

मुंबई : मोठ्या भरतीच्या दिवशी मुसळधार पाऊस कोसळल्यास मुंबईची तुंबापुरी होते. हेच नव्हेतर पालिकेच्या दाव्यानुसार ‘नीप टाइड’चे दिवसही मुंबईसाठी धोकादायक ठरू लागले आहेत. त्यामुळे पुढच्या तीन महिन्यांत मोठ्या भरतीचे २० दिवस आणि नऊ दिवस नीप टाइडचा सामना करावा लागणार आहे.मुंबईतील पर्जन्य जलवाहिन्या ताशी सुमारे ५० मि.मी. पावसाचे पाणी वाहून नेत आहेत. मात्र मोठ्या भरतीच्या दिवशी समुद्रात ४.५ मीटर उंचीच्या लाटा उसळतात. अशा वेळी मुसळधार पाऊस आल्यास सखल भागांमध्ये पाणी तुंबते. दोन वर्षांपूर्वी नीप टाइडच्या दिवशी मोठा पाऊस होऊन मुंबईची तुंबापुरी झाली होती. त्यानंतर मोठ्या भरतीच्या दिवसांबरोबरच नीप टाइडच्या दिवसांचीही यादी पालिकेने तयार करण्यास सुरुवात केली.या दोन्ही भरतीच्या याद्या वाहतूक पोलीस, अग्निशमन दल, अन्य प्राधिकरणांना पालिका आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने पाठविल्या आहेत. गेल्या चार दिवसांतील दोन दिवस नीपच्या काळातच मुसळधार पाऊस झाल्याने मुंबईत पाणी तुंबल्याचा पालिकेचा दावा आहे.असे आहेत नीप टाइडचे दिवस...जेव्हा मोठी भरती आणि आहोटीमधील अंतर कमी असते - जुलैमध्ये २५, २६, २७; २४ आणि २५ आॅगस्ट. सप्टेंबर महिन्यात ७, ८, २२, २३.मोठ्या भरतीचे दिवस - जुलै - २ (४.५४ मीटर), ३ (४.६९ मी.), ४ (४.७८ मी.), ५ (४.७९ मी.), ६ (४.७४ मी.), ७ (४.६० मी.), ३१ (४.५३ मी.)आॅगस्ट - १ (४.७४ मी.), २ (४.८७ मी.), ३ (४.९० मी.), ४ (४.८३ मी.), ५ (४. ६५ मी.), २९ (४.५३ मी.), ३० (४.७७ मी.), ३१ (४.९० मी.)सप्टेंबर - १ (४.९१ मी.), २ (४.६७ मी.), ३ (४.५४ मी.), २७ (४.५१ मी.), २८ (४.७२ मी.), २९ (४.६३ मी.), ३० (४.८३ मी.)

टॅग्स :मुंबई