मुंबईचा दहावीचा निकाल २९.८८ तर बारावीचा १६.४२ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:06 AM2020-12-24T04:06:48+5:302020-12-24T04:06:48+5:30

पुरवणी परीक्षा : बारावीच्या एकूण निकालात घट, दहावीचा निकाल वाढला लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्य मंडळाने नोव्हेंबर आणि ...

Mumbai's 10th result is 29.88 and 12th result is 16.42 percent | मुंबईचा दहावीचा निकाल २९.८८ तर बारावीचा १६.४२ टक्के

मुंबईचा दहावीचा निकाल २९.८८ तर बारावीचा १६.४२ टक्के

Next

पुरवणी परीक्षा : बारावीच्या एकूण निकालात घट, दहावीचा निकाल वाढला

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्य मंडळाने नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये घेतलेल्या दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. मुंबई विभागाचा बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल १६.४२ टक्के तर दहावी पुरवणी परीक्षेचा निकाल २९.८८ टक्के लागला. बारावीच्या निकालात मागील २ वर्षांपेक्षा घट झाल्याचे तर दहावीच्या निकालात वाढ झाल्याचे दिसून आले.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा १८ नोव्हेंबर ते १० डिसेंबर आणि लेखी परीक्षा २० नोव्हेंबर ते १० डिसेंबरदरम्यान घेतली होती. २२,७०० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातील केवळ ३,७२८ म्हणजे १६.४२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. २०१८ साली जुलै-ऑगस्टमधील बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल १९.२७ टक्के तर २०१९ साली १९.१२ टक्के लागला होता. यंदा यात २.७ टक्के घट दिसून आली.

दुसरीकडे दहावीची प्रात्यक्षिक परीक्षा १८ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर आणि लेखी परीक्षा २० नोव्हेंबर ते ५ डिसेंबरदरम्यान पार पडली. १२,६४६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. ३,७७९ म्हणजे २९.८८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. २०१८ साली ही टक्केवारी १४.२१ तर २०१९ साली १४.४१ इतकी होती. यंदा यात १५.४ टक्के वाढ झाली.

उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती व पुनर्मूल्यांकन अर्ज

ऑनलाइन निकालानंतर दुसऱ्या दिवसापासून गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यात येतील. दहावीसाठी https://verification.mh-ssc.ac.in आणि बारावीसाठी https://verification.mh-hsc.ac.in या संकेतस्थळावर सर्व माहिती व सूचना देण्यात आल्या आहेत. गुण पडताळणीसाठी २४ डिसेंबर ते २ जानेवारी २०२१पर्यंत ५० रुपये शुल्क ऑनलाइन भरून अर्ज करता येतील. तर उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रतीसाठी २४ डिसेंबरपासून १२ जानेवारीपर्यंत ४०० रुपये शुल्क ऑनलाइन भरून अर्ज करता येईल.

* राज्यात अकरावी प्रवेशासाठी १९ हजार विद्यार्थी पात्र

राज्यात दहावी पुरवणी परीक्षा देऊन एक किंवा दोन विषयांत उत्तीर्ण होऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १९ हजार ८१२ इतकी आहे. हे विद्यार्थी शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये एटीकेटी सवलीतद्वारे इयत्ता ११ वीच्या प्रवेशासाठी पात्र ठरतील.

................................

Web Title: Mumbai's 10th result is 29.88 and 12th result is 16.42 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.