प्रदूषणात आला मुंबईचा १२४ वा नंबर; स्वच्छ हवेचा आराखडा येईल मदतीला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 10:23 AM2022-03-24T10:23:45+5:302022-03-24T10:26:30+5:30

२०२० मध्ये मुंबई प्रदूषणाबाबत १४१ क्रमांकावर होती. तर २०२१ मध्ये मुंबई १२४ क्रमांकावर आली आहे.

Mumbai's AQI at 124, pollution level 'moderate' | प्रदूषणात आला मुंबईचा १२४ वा नंबर; स्वच्छ हवेचा आराखडा येईल मदतीला

प्रदूषणात आला मुंबईचा १२४ वा नंबर; स्वच्छ हवेचा आराखडा येईल मदतीला

googlenewsNext

- सचिन लुंगसे

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील प्रदूषण झपाट्याने वाढत असल्याचा निष्कर्ष जागतिक वायू गुणवत्ता २०२१ च्या अहवालात काढण्यात आला आहे. २०२० मध्ये मुंबई प्रदूषणाबाबत १४१ क्रमांकावर होती. तर २०२१ मध्ये मुंबई १२४ क्रमांकावर आली आहे. या प्रदूषणापासून मुक्तता मिळवायची असेल किंवा प्रदूषण कमी करायचे असेल तर,मुंबई स्वच्छ हवा,मुंबई हवामान कृती आराखडाच मुंबईला तारू शकेल,असा विश्वास पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

२०२१ मध्ये देशभरातील वायू प्रदूषणाचे प्रमाण अधिकच वाढले आहे. घातक आणि सूक्ष्म प्रदूषकांचे प्रमाण वाढतच असून, जागतिक आरोग्य संघटनेच्या हवेच्या गुणवत्ता मार्गदर्शक तत्त्वांपेक्षा हे १० पट जास्त आहे. चेन्नई वगळता उर्वरित बहुतांश शहरांत प्रदूषणाने कहर केला आहे. मुंबईतील वायू प्रदूषण पातळी जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमाणापेक्षा जवळजवळ ३ पट आहे. अहवालानुसार, मुंबईत गेल्या वर्षी हिवाळ्यात पीएम २.५ (प्रदूषक कणांचे प्रमाण) वाढले आहे. त्यात नोव्हेंबर ते फेब्रुवारीपर्यंत वाढ झाली आहे. या चार महिन्यांत,पीएम २.५ ची श्रेणी ६३.५ ते ९८.५ मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर आहे.

पीएम २.५ मुळे होतात गंभीर आजार 
सूक्ष्म प्रदूषके २.५ म्हणून ओळखली जातात. हे सामान्यत: सर्वात हानिकारक आणि सर्वाधिक निरीक्षण केलेले वायू प्रदूषक मानले जाते. यामुळे दमा, पक्षाघात,हृदय आणि फुफ्फुसाचे आजार अधिक गंभीर होऊ शकतात. पीएम २.५ मुळे दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू होतो. 

मुंबई अधिक प्रदूषित होत असल्याचे हा अहवाल दाखवतो. मुंबई पुन्हा २०१८ च्या धोकादायक पातळीला पोहोचली आहे. सध्याची परिस्थिती पाहता मुंबई स्वच्छ हवा आणि मुंबई हवामान कृती आराखड्यात वायू प्रदूषणाबाबत सुचविलेल्या उपाययोजनांची राज्य सरकारने तातडीने अंमलबजावणी करावी.
- भगवान केशभट, संस्थापक,वातावरण फाउंडेशन

Read in English

Web Title: Mumbai's AQI at 124, pollution level 'moderate'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.