मुंबईत घातपाताचा कट? : शालिमार एक्स्प्रेसमध्ये आढळली बॉम्बसदृश वस्तू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2019 02:30 AM2019-06-06T02:30:01+5:302019-06-06T06:33:30+5:30

लोकमान्य टिळक टर्मिनस येथील घटना; तपासाअंती बॉम्ब नसल्याचे सिद्ध

Mumbai's assassination cut? : Bombshell items found in Shalimar Express | मुंबईत घातपाताचा कट? : शालिमार एक्स्प्रेसमध्ये आढळली बॉम्बसदृश वस्तू

मुंबईत घातपाताचा कट? : शालिमार एक्स्प्रेसमध्ये आढळली बॉम्बसदृश वस्तू

Next

मुंबई : लोकमान्य टिळक टर्मिनस येथे बुधवारी दुपारच्या सुमारास उभ्या असलेल्या शालिमार एक्स्प्रेसमध्ये जिलेटीनच्या ५ कांड्या आणि बॉम्बसदृश वस्तू आढळून आल्याने खळबळ उडाली. सुरक्षा विभागाने तपास केला असता, ती बॉम्बसदृश वस्तू बॉम्ब नसल्याचे सिद्ध झाले. मात्र, या साहित्यासह धमकीचे पत्रही होते. त्यात मुंबईत बॉम्बस्फोट करण्यात येणार असल्याची पूर्वसूचना देण्यात आली आहे.

बुधवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास शालिमार एक्स्प्रेसची साफसफाई करत असताना, जिलेटीन कांड्या आणि बॉम्बसदृश वस्तू आढळून आल्या. त्यानंतर, तात्काळ लोकमान्य टिळक टर्मिनस येथे रेल्वे सुरक्षा बल, रेल्वे पोलीस, महाराष्ट्र सुरक्षा बल, बॉम्बशोधक आणि निकामी पथक, श्वानपथक दाखल झाले. त्यामुळे स्थानकाला छावणीचे स्वरूप आले होते.

सुरक्षा विभागाने स्थानक परिसर रिकामा करून एक्स्प्रेसची तपासणी केली. या तपासात बॅटरी, विद्युत तारा, पक्कड, ५ जिलेटीनच्या कांड्या आणि धमकीचे पत्र मिळाले. एक्स्प्रेसमधील हे साहित्य आणि पत्र कुठून आले याचा शोध सुरू आहे. दरम्यान, मुंबई नेहमीच दहशतवाद्यांच्या लक्ष्य असते. त्यामुळे कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी पोलिसांनी महत्त्वाच्या ठिकाणांच्या सुरक्षेत आणखी वाढ केली आहे.

मध्य रेल्वे मार्गावरील लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) येथे बुधवारी दुपारच्या सुमारास उभ्या असलेल्या शालिमार एक्स्प्रेसमध्ये जिलेटीनच्या ५ कांड्या आणि बॉम्बसदृश वस्तूसोबतच एक पत्रही सापडले. या पत्रात ईद मुबारक, बॉम्बसदृश वस्तू फक्त गोंधळात टाकण्यासाठीच असल्याचे नमूद आहे. मुंबईत बॉम्बस्फोट घडवून आणण्याची पूर्वसूचनाच या पत्राद्वारे देण्यात आली आहे.

ईद मुबारक, आपल्याला ही बॉम्बसदृश वस्तू फक्त गोंधळात टाकण्यासाठी एक्स्प्रेसमध्ये ठेवले आहे. आम्ही आमच्या चार जणांना बॉम्ब ठेवण्यासाठी पाठविले आहे. या चार जणांनी सांगण्यात आलेल्या तारखेला आणि वेळेला बॉम्ब ठेवला आहे. बॉम्ब कुठे लावला आहे, याची पुसटशी कल्पना कोणालाही नाही. काम झाल्यानंतर आमची माणसे मध्यप्रदेशला रवाना होणार आहेत. भाजपला आम्हाला दाखवून द्यायचे आहे, की आम्ही काय करू शकतो. आमचे हात जेव्हा खुले होतात, तेव्हा काय होते, ते आम्ही दाखवू. आम्हाला चारही जणांना एकमेकांच्या संपर्कात राहायचे आहे. आम्ही काय करू शकतो, हे सर्वांना दाखवून देणार आहोत, अशा आशयाचे हे पत्र शालीमार एक्स्प्रेसमध्ये सापडले आहे.

मध्य रेल्वे मार्गावरील लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) येथे बुधवारी दुपारच्या सुमारास उभ्या असलेल्या शालिमार एक्स्प्रेसमध्ये जिलेटीनच्या ५ कांड्या आणि बॉम्बसदृश वस्तू आढळून आल्या. तत्काळ लोकमान्य टिळक टर्मिनस येथे रेल्वे सुरक्षा बल, रेल्वे पोलीस, महाराष्ट्र सुरक्षा बल, बॉम्बशोधक आणि निकामी पथक, श्वान पथक दाखल झाले. त्यांनी एक्स्प्रेसची पाहणी केली. तपासणीअंती बॉम्बसदृश वस्तू बॉम्ब नसल्याचे उघडकीस आले.

अफवांवर विश्वास ठेवू नका
घटनास्थळी सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. बॉम्बसदृश वस्तू दिसून आली. शालिमार एक्स्प्रेसमध्ये जिलेटीन कांड्या, बॅटरी, रॉकेट, विद्युत तारा अशा वस्तू सापडल्या आहेत. या वस्तूंमुळे कोणताही स्फोट होऊ शकत नाही. मात्र, या सर्व प्रकरणाचा तपास सुरू आहे. प्रवाशांनी अफवांवर विश्वास ठेवू नका. - अश्रफ के. के., विभागीय वरिष्ठ सुरक्षा आयुक्त, मध्य रेल्वे.

सुरक्षा व्यवस्थेत वाढ
देशात नुकताच पुलवामा येथे सीआरएएफ जवानांवर झालेला हल्ला, कानपूर-भिवानी कालिंदी एक्स्प्रेस शौचालयात झालेला कमी तीव्रतेचा स्फोट, तसेच कर्जत-आपटा एसटीत आढळून आलेला आयईडी बॉम्ब या घटना ताज्या आहेत. त्यातच इसिसचे १५ दहशतवादी सागरी मार्गाने लक्षद्वीपकडे रवाना झाल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेकडून देण्यात आली आहे. त्यामुळे केरळसह संपूर्ण किनारपट्टीवरील सुरक्षा वाढविण्यात आली आहे. मुंबईतील गर्दीच्या रेल्वे स्थानकांवर सुरक्षा व्यवस्थेला बळकटी देण्यात आली आहे. सुरक्षा व्यवस्थेकडून श्वान पथक, बॉम्ब शोधक आणि निकामी पथक, ऑपरेशन बॉक्स, कोम्बिंग आॅपरेशन सुरू आहे, असे रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: Mumbai's assassination cut? : Bombshell items found in Shalimar Express

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.