मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईकरांना कमालीचा गारठा अनुभवास येत असतानाच, दुसरीकडे मात्र मुंबईचे आरोग्य बिघडले आहे. मुंबईच्या वातावरणात धूर, धुके, धूळ यांचे प्रमाण वाढत असून, याच्या मिश्रणामुळे निर्माण होत असलेल्या धूरक्याने मुंबईकरांच्या नाकीनऊ आणले आहेत. महत्त्वाचे म्हणजे, शुक्रवारी मुंबई शहर आणि उपनगरावर कमालीच्या धूरक्याची नोंद झाली असून, या प्रदूषणाबाबत दिल्ली खालोखाल मुंबईचा क्रमांक आहे.मुंबई शहर आणि उपनगरात वाहत असलेली वाहने, सुरू असलेली बांधकामे यांचा हा परिणाम आहे. वाहनांच्या धुरामुळे मुंबईचे प्रदूषण सातत्याने वाढत आहे. ‘सफर’च्या शुक्रवारच्या नोंदीनुसार, अंधेरी, मालाड, बीकेसी आणि माझगाव या परिसरात कमालीच्या प्रदूषणाची नोंद झाली आहे. पूर्व उपनगराच्या तुलनेत पश्चिम उपनगरात आणि मुंबई शहरात अधिक प्रदूषण नोंदविण्यात येत आहे.येथील हवामानाचा विचार करता, मुंबईचे किमान तापमान शुक्रवारी १५ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे. राज्यात सर्वात कमी किमान तापमान अहमदनगर येथे ७.६ अंश नोंदविण्यात आले आहे.- मुंबई शहराचा विचार करता समुद्र किनाऱ्यावरील वातावरण अदृश्य स्वरूपाचे नोंदविण्यात आले. मरिन लाइन्स, रे रोड, वरळी, महालक्ष्मी, लोअर परळ येथील वातावरणात कमालीचे धुरके निदर्शनास आले.अंधेरीसह मालाडचा विचार करता, मुंबई शहराच्या तुलनेत पश्चिम उपनगरातील धूरक्याचे प्रमाण तुलनेने अधिक नोंदविण्यात आले. येथील वातावरणात अधिकचे धूरके असून, येथील वातावरणही अदृश्य स्वरूपाचे नोंदविण्यात आले.- मुंबई आणि आसपासच्या परिसराचा विचार करता, ५ जानेवारी रोजी आकाश मुख्यत: निरभ्र राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३३, १६ अंशाच्या आसपास राहील. ६ जानेवारी रोजी आकाश अंशत: ढगाळ राहील.मुंबईच्या हवेचादर्जा घसरलापरिसर हवेचीगुणवत्ताअंधेरी ३९२मालाड ३७८बीकेसी ३६६माझगाव ३२१चेंबूर २५६कुलाबा २४५वरळी २४४भांडुप २२४बोरीवली १९७(पार्टीक्युलेट मॅटरमध्ये)शहर हवेचीगुणवत्तादिल्ली ३६९मुंबई २८५अहमदाबाद २१९पुणे १२८(पार्टीक्युलेट मॅटरमध्ये)