मुंबईच्या बीचेसवरीेल जीवरक्षकांचे होणार खाजगीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2018 10:33 AM2018-06-14T10:33:24+5:302018-06-14T10:33:24+5:30

मुंबईच्या गिरगाव,दादर, जुहू,वर्सोवा,आकसा, व गोराई या सहा प्रमुख बीचेसवर आता भविष्यात खाजगीकरण होणार असतील.

Mumbai's Beaches and Survivors will be privatized | मुंबईच्या बीचेसवरीेल जीवरक्षकांचे होणार खाजगीकरण

मुंबईच्या बीचेसवरीेल जीवरक्षकांचे होणार खाजगीकरण

Next

मनोहर कुंभेजकर 

मुंबई - मुंबईच्या गिरगाव,दादर, जुहू,वर्सोवा,आकसा, व गोराई या सहा प्रमुख बीचेसवर आता भविष्यात खाजगीकरण होणार असतील. मुंबई फायरब्रिगेडने जीवरक्षकांचे खाजगीकरण करण्याचा निर्णय घेतला असून यासंदर्भात वर्तमानपत्रात जाहिरात देण्यात आली आहे. ऑनलाईन बोली सादर करण्याची तारिख येत्या 2 जुलै दुपारी 4 पर्यंत आहे.

3 वर्षा करिता मुंबई फायर ब्रिगेडने जीवरक्षक पुरवण्यासाठी   जाहिरात दिली आहे.झोन 1,2 साठी 7 लाख 13 हजार,झोन 3,4 साठी 12 लाख 31 हजार 100 व झोन 7 साठी 4 लाख 61 हजार 100 रुपये असे हे कंत्राट असल्याचे जाहिरातीत नमूद करण्यात आले आहे.
सध्या मुंबईत कायमस्वरूपी 11,कंत्राटी 21 व हंगामी 6 असे एकूण 38 जीवरक्षक आहेत.मुंबई फायर ब्रिगेड तर्फे कंत्राटी जीवरक्षकांना महिना 12 हजार व हंगामी जीवरक्षकांना 10 हजार पगार दिला जातो,आणि त्यांना दर सहा महिन्यांनी एकदा ब्रेक दिला जातो.यावेळी मुंबईतील बीचेसवर या ब्रेकच्या दिवशी  जीवरक्षकच नसतात!
मुंबईतील बीचेसवर 10 तास जीवरक्षक डोळ्यात तेल घालून आपली ड्युटी करतात,मात्र देशात सर्वात श्रीमंत महापालिका असा नावलौकिक असलेली मुंबई महानगर पालिका कंत्राटी जीवरक्षकांना व हंगामी जीवरक्षकांना तुटपुंजा पगार देते.
या विरोधात 2013 मध्ये
मुंबई म्युनिसिपल युनियनने कामगार न्यायालयात खटला दाखल केला असून त्यांना मुंबई फायर ब्रिगेडमध्ये कायमस्वरूपी सामावून योग्य वेतन द्यावे अशी मागणी केली आहे.यावर कामगार न्यायालयाने युनियनची बाजू मान्य करत या कंत्राटी जीवरक्षकांना कायमस्वरूपी कामावर घ्यावे असा निकाल दिला होता.मात्र या विरोधात मुंबई फायर ब्रिगेडने मुंबई उच्च न्यायालयात अपील केले नाही.
गेल्या वर्षी सुद्धा मुंबई फायर ब्रिगेडने 100 जीवरक्षक पुरवण्यासाठी जाहिरात दिली होती.मात्र कामगार न्यायालयात खटला असल्यामुळे सदर जाहिरातीला स्थगिती दिली होती अशी माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Mumbai's Beaches and Survivors will be privatized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.