एअरपोर्ट ‘चेक इन’ की भुरट्या चोरांचा अड्डा ?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2024 10:38 AM2024-02-06T10:38:26+5:302024-02-06T10:41:33+5:30

अतिसुरक्षित ठिकाण म्हणून मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाची ओळख आहे.

mumbai's chhatrapati shivaji maharaj international airport became insecure for passengers | एअरपोर्ट ‘चेक इन’ की भुरट्या चोरांचा अड्डा ?

एअरपोर्ट ‘चेक इन’ की भुरट्या चोरांचा अड्डा ?

मुंबई : अतिसुरक्षित ठिकाण म्हणून मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाची ओळख आहे. मात्र, या ठिकाणी दामदुप्पट पैसे मोजून तिकीट खरेदी करणाऱ्या प्रवाशांच्या बॅगमधून चेक इन दरम्यान रोख रक्कम, दागिने तसेच मौल्यवान वस्तू चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे विमानतळाच्या विश्वासार्हतेला तडा जाऊन सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

लाखभर रुपये चोरले :

मणिपाल ग्रुप फर्मचे संचालक बिनोदकुमार मंडल बुधवारी मंगळुरूहून मुंबईला जात असताना त्यांच्या बॅगमधून एक लाख रुपये आणि पाच रुपयांचे फाउंटन पेन गायब आले. याविरोधात त्यांनी सहार पोलिसांत तक्रार दिली.

दागिने केले लंपास :

कॉम्प्युटर सेल्स अॅण्ड सव्र्व्हिसचा व्यवसाय करणाऱ्या इरफान वोहरा (वय ४५) यांची दागिने असलेली बॅग विमानतळावरून त्यांच्या नकळत एका व्यक्त्तीने पळवली, हे त्याना बंगळुरु विमानतळामुळे समजले. कार्गो कर्मचारी अटकेत इंडिगो विमानाने दिल्लीतून मुंबईला आलेल्या विनोदकुमार गर्गना रिसिव्ह करायला त्याची मुलगी सगीता या आतरराष्ट्रीय एअरपोर्टच्या पी ६ आगमन परिसरात आल्या. त्यावेळी ट्रॉलीतून त्यांची बॅग लंपास केल्याप्रकरणी सुनील मिरेकर या खासगी कागों कंपनी कर्मचान्याला अटक केली.

स्क्रिनर, लोडर संशयित :

या चोऱ्यांमध्ये विमानतळावरील कर्मचाऱ्याचाच हात असल्याचा संशय पोलिसांना आहे. ज्यात लोडर, स्क्रीनर किवा फ्रिडरचा समावेश असू शकतो. त्यामुळे या चोरांना लवकरात लवकर अटक करत या चोऱ्यांवर अंकुश बसवण्याचा प्रयत्न तपास अधिकारी करत आहेत.

प्रवासी म्हणतात... 

तुम्ही नवीन शहरात प्रवेश करता तेव्हा खिसा कापण्याची किया पैसे हिसकावून घेण्याची शक्यता नेहमीच असते. त्यामुळे चोरी होऊ नये या विचाराने रोख रक्कम किया मौल्यवान वस्तू आपण बॅगेत ठेवतो. मात्र, आता कडेकोट सुरक्षा असलेल्या विमानतळसारख्या परिसरात असे गुन्हे घडू लागल्याने असुरक्षेची भावना निर्माण होत आहे.

Web Title: mumbai's chhatrapati shivaji maharaj international airport became insecure for passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.