मुंबई बनतेय ‘हादसों का शहर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 02:09 AM2018-03-29T02:09:10+5:302018-03-29T02:09:10+5:30

‘मुंबई हादसों का शहर है...’ असे म्हटले जाते. येथे सातत्याने काही ना काही दुर्घटना घडत असतानाच, येथे सातत्याने लागणाऱ्या

Mumbai's 'City of Hurt' | मुंबई बनतेय ‘हादसों का शहर’

मुंबई बनतेय ‘हादसों का शहर’

Next

मुंबई : ‘मुंबई हादसों का शहर है...’ असे म्हटले जाते. येथे सातत्याने काही ना काही दुर्घटना घडत असतानाच, येथे सातत्याने लागणाऱ्या आगी रौद्र रूप धारण करत आहेत. डम्पिंग ग्राउंडची आग असो, अन्यथा झोपड्यांना लागणाºया आगी असोत. आगीसारख्या दुर्घटनांत मनुष्यहानीसह वित्तहानी मोठ्या प्रमाणावर होत असून, विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, मुंबई शहर आणि उपनगरात सप्टेंबर आणि आॅक्टोबर महिन्यांत १ हजार २६९ दुर्घटना घडल्या आहेत. या दुर्घटनांत ६२ जण जखमी, तर १९ जणांचा मृत्यू झाला आहे.
रविवारी मुंबईत दोन आगीच्या घटना घडल्या. अंधेरी येथे लागलेल्या आगीत सुदैवाने मनुष्यहानी झाली नसली, तरी चेंबूर येथे लागलेल्या आगीत एका चिमुरडीचे प्राण गेले. ही घटना नुकतीच घडलेली असली, तरी नव्या वर्षाच्या प्रारंभी मुंबई शहर आणि उपनगरात अग्नितांडव सुरू झाले होते. छोट्या-मोठ्या आगींनी मुंबईला कवेत घेतले होते. त्यानंतर, आगीच्या घटना थांबल्या असल्या, तरी पुन्हा आगीच्या घटनांना डोके वर काढले. अंधेरी आणि चेंबूरची आगीची घटना ताजी असतानाच, बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील जंगलात पेट घेतलेल्या वणव्याने यात आणखी भर घातली. जंगलात लागणाºया आगी, लागत नसून, लावल्या जात असल्याचे आरोप पर्यावरणवाद्यांनी केले. मागील आठवड्यात येथील जंगलात तब्बल दोन वेळा आग लागल्याची घटना घडली. येथे लागलेली आग विझविण्यासाठी प्रशासनाला पर्यावरणवाद्यांसह भांडुप येथे कार्यरत असलेल्या ‘पॉज’ या प्राणिमित्र संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मदत केली.
सूत्रांकडून प्राप्त आकडेवारीनुसार, मुंबईत सप्टेंबर आणि आॅक्टोबर या दोन महिन्यांत १ हजार २६९ दुर्घटना घडल्या. त्यात तब्बल ६२ जण जखमी झाले असून, १९ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. सप्टेंबर महिन्यात १ ते १५ सप्टेंबर दरम्यान ३१६ घटना घडल्या, त्यात २५ जण जखमी झाले, तर १२ जणांचा मृत्यू झाला. १६ ते ३० सप्टेंबर दरम्यान ३५९ घटना घडल्या, त्यात १४ जखमी झाले, तर ३ जणांचा मृत्यू झाला. १ ते १५ आॅक्टोबर दरम्यान २७६ दुर्घटना घडल्या. त्यात ९ जण जखमी झाले, तर २ जणांचा मृत्यू झाला. १५ ते ३१ आॅक्टोबर दरम्यान ३१८ घटनांत १४ जण जखमी झाले, तर २ जणांचा मृत्यू झाला.

Web Title: Mumbai's 'City of Hurt'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.