लॉकडाऊनमुळे मुंबईचा डबेवाला अडचणीत, रोहित पवारांनी दिली व्हिसिट  

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2020 05:16 PM2020-08-27T17:16:26+5:302020-08-27T17:51:39+5:30

मुंबईतील डबेवालेही आज अडचणीत आहे, काल त्यांना भेटलो. त्यांच्या संघटनेचे सुमारे ५ हजार सदस्य असून अडचणीतील सदस्यांना मदतीचा हात देता यावा यासाठी त्यांनी एक निधी उभा केलाय

Mumbai's Dabewala in trouble due to lockdown, Rohit Pawar gave a visit | लॉकडाऊनमुळे मुंबईचा डबेवाला अडचणीत, रोहित पवारांनी दिली व्हिसिट  

लॉकडाऊनमुळे मुंबईचा डबेवाला अडचणीत, रोहित पवारांनी दिली व्हिसिट  

googlenewsNext
ठळक मुद्देमुंबईतील डबेवालेही आज अडचणीत आहे, काल त्यांना भेटलो. त्यांच्या संघटनेचे सुमारे ५ हजार सदस्य असून अडचणीतील सदस्यांना मदतीचा हात देता यावा यासाठी त्यांनी एक निधी उभा केलाय

मुंबई - लॉकडाऊनचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला आहे. हातारचं पोट असलेल्या आणि दररोज लहान-मोठे उद्योग करुन उदरनिर्वाह करणाऱ्यांना लॉकडाऊनमुळे मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागलं आहे. त्यात, मुंबईतलोकल रेल्वेसेवा बंद असल्याने लोकल प्रवासावर अवलंबून असलेल्या पादचारी, व्यवसायिक आणि किरकोळ विक्रेत्यांना मोठा फटका बसला आहे. मुंबईची शान असलेला मुंबईचा डबेवालाही या तडाख्यात सापडला आहे. मुंबईतील डबेवाल्यांची अडचण लक्षात घेऊन आमदार रोहित पवार यांनी त्यांना मदत केली आहे.

मुंबईतील डबेवालेही आज अडचणीत आहे, काल त्यांना भेटलो. त्यांच्या संघटनेचे सुमारे ५ हजार सदस्य असून अडचणीतील सदस्यांना मदतीचा हात देता यावा यासाठी त्यांनी एक निधी उभा केलाय. आपल्याच परिवारातील घटक असलेल्या या डबेवाल्यांना मदत करायची तुमची इच्छा असेल तर फोटोवरील नंबरवर संपर्क करावा, असे आवाहन रोहित पवार यांनी केलंय. रोहित पवार यांनी यापूर्वीही मुंबईतील बडेवाल्यांची भेट घेऊन त्यांच्यासमवेत एक दिवस दादर ते चर्चगेट असा लोकल प्रवास केला होता. 


मुंबईकरांना जागोजागी जाऊन भूकेल्यांच्या पोटात दोन घास भरवणारा मुंबईचा डबेवाला त्यांच्या नियोजनबद्ध कार्यामुळे साता-समुद्रापार पोहोचला आहे. त्यातूनच डबेवाल्यांकडून समाजाभिमूख कार्यातही सहभाग नोंदविण्यात येत आहे. मुंबईतील मराठा क्रांती मोर्चात डबेवाल्यांनी सहभाग नोंदवला होता. तर अण्णा हजारेंच्या जनलोकपाल आंदोलनातही त्यांनी आपला पाठिंबा दर्शवत सहभाग नोंदवला होता. तर, केरळच्या मदतीसाठी डबेवाला पुढे आला आहे. त्यामुळे मुंबईचा डबेवाला आता सर्वांनाच आपलासा वाटतो. रोहित पवार यांनी डबेवाल्यांची भेट घेऊन त्यांना मदत करण्याचं आवाहन नागरिकांना केलं आहे. 

दरम्यान, मुंबईतील डबेवाल्यांच्या स्कीलची भुरळ इंग्लंडच्या युवराजालाही पडली होती. तसंच माझं कॉलेजचं शिक्षणही मुंबईत झाल्यामुळे मलाही या डबेवाल्यांच्या कामाबाबत खूप दिवसांपासून आकर्षण आहे. मुंबईकर चाकरमान्यांना गरमागरम घरचं जेवण ऑफिसमध्ये मिळतं पण त्यामागे डबेवाल्यांचे किती कष्ट असतात आणि त्यासाठी जगातला कोणताही मॅनेजमेंटचा कोर्स न करताही हे लोक कसे डबे पोचवतात हे जाणून घेण्यासाठी मी मुंबईत डबेवाल्यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत चर्चगेट ते दादर असा लोकल प्रवास करुन प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेत एक दिवस मीही त्यांच्यातलाच एक डबेवाला होऊन गेलो, असे सांगत रोहित यांनी यापूर्वी डबेवाल्यांच्या आठवणी जागवल्या होत्या. त्यानंतर, रोहित यांनी मुंबईतील बडेवाल्यांच्या प्रश्नासाठी, त्यांच्या घरांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन प्रश्न सोडविण्याची विनंती केली होती. आता, लॉकडाऊनमुळे अडचणीत असलेल्या डबेवाल्यांना मदतीचा हात देण्याचं आवाहन पवार यांनी केलंय.

Web Title: Mumbai's Dabewala in trouble due to lockdown, Rohit Pawar gave a visit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.