Join us

मुंबईकरांची पहाट झाली ‘संगीतमय’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2020 11:57 PM

सूर, बासरी, संवादिनी, सितार, सरोद, व्हायोलिन या वाद्यांचे स्वर आणि ताल वाद्यांच्या साथीने रविवारची सकाळ मुंबईकरांसाठी वेगळी ठरली.

मुंबई : सूर, बासरी, संवादिनी, सितार, सरोद, व्हायोलिन या वाद्यांचे स्वर आणि ताल वाद्यांच्या साथीने रविवारची सकाळ मुंबईकरांसाठी वेगळी ठरली. निमित्त होते ते मुंबई महापालिकेच्या उद्यानांमधील खुल्या नाट्यगृहांमध्ये आयोजित संगीत सभांचे. महापालिकेच्या २० उद्यानांमधील खुल्या नाट्यगृहांमध्ये आयोजित संगीत सभांना मुंबईकरांनी रविवारी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.मुंबई महापालिकेच्या उद्यान खात्याच्या पुढाकाराने आणि स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने रविवारी सकाळी ७ वाजता ते ९ दरम्यान आयोजित संगीत सभांमध्ये १२०पेक्षा अधिक उदयोन्मुख संगीत साधकांनी भारतीय शास्त्रीय संगीताचे विविध पैलू उलगडत, आपली कला सादर करीत उपस्थित रसिकांची मने जिंकून घेतली. विशेष म्हणजे रविवार, त्यात हिवाळ्यातील पहाटेचे थंड वारे असूनही मुंबईकरांनी या संगीत सभांना भरभरून प्रतिसाद दिला. या संगीत सभांबाबत मुंबईकर नागरिकांनी अतिशय उत्साहवर्धक प्रतिक्रिया नोंदविण्यासह यापुढेही असे कार्यक्रम नियमितपणे आयोजित करावेत, अशा सूचनाही महापालिकेच्या उद्यान खात्याकडे केल्या आहेत, अशी माहिती उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी केली आहे.मुंबई ग्रीन रागा या शीर्षकांतर्गत महापालिकेच्या पुढाकाराने आणि टेंडर रूट्स अकादमी या स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने रविवारी सकाळी ७ वाजता आयोजित संगीत कला आविष्कारणाचे हे दुसरे वर्ष होते. गेल्या वर्षी नववर्षाच्या सुरुवातीला महापालिकेच्या १७ उद्यानांमध्ये अशाच प्रकारचे भारतीय शास्त्रीय संगीतावर आधारित कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते, महापालिकेच्या २० उद्यानांमधील खुल्या वतुर्ळाकार नाट्यगृहांमध्ये संगीत सभांचे आयोजन केले होते़>१९ उद्यानांमध्ये वर्तुळाकार मंचकलाकारांना त्यांच्या कला सादर करता याव्यात, यासाठी २९ उद्यानांमध्ये वर्तुळाकार किंवा अर्ध वर्तुळाकार मंच उपलब्ध आहेत.या ठिकाणी रसिकांना कलेचा आस्वाद घेण्यासाठी वर्तुळाकार किंवा अर्ध वर्तुळाकार आसन व्यवस्थादेखील आहे.या आसन व्यवस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे, या ठिकाणी बसण्यासाठी खुर्च्यांऐवजी बांधलेल्या वैशिष्ट्यपूर्ण पायऱ्या आहेत.रसिकांना ऐसपैसरीत्या बसता यावे, यासाठी या पायऱ्यांची रुंदी अधिक ठेवण्यात आली आहे.या व्यतिरिक्त अनेक उद्यानांमध्ये खुले मंच किंवा चबुतरेदेखील आहेत.नोकरी धंद्यानिमित्त धावपळीत असलेल्या चाकरमान्यांच्या मनावरील ताण हलका करण्यासाठी महापालिकेने नववर्षाची अनोखी भेट यानिमित्ताने महापालिकेने मुंबईकरांना दिली आहे.संगीतामुळे सुखात आनंद द्विगुणित होत असतो तर दु:खात मनाच्या जखमांवर हळुवार फुंकर घातली जाते. संगीतासाठी कोणतेही वय, बंधन नाही. ताणतणावापासून मुक्त करणाºया संगीताचे आयोजन खास मुंबईकरांसाठी करण्यात आले.>संगीत सभांसाठीची उद्यानेकमला नेहरू उद्यान, मलबार हिलटाटा उद्यान, ब्रीचकँडी रुग्णालयाजवळ,भुलाभाई देसाई मार्गजोसेफ बाप्टिस्टा उद्यान, माझगावआद्य शंकराचार्य उद्यान, पोलीस कॉलनी,सर पोचखानवाला मार्ग, वरळीहिंदुहृदयसम्राट बाळासाहेब केशव ठाकरे मनोरंजन मैदानप्रकाश कॉटन मिलजवळ,परळ (लोअर परेल)वीररत्न बाजीप्रभू उद्यान, शिवाजी पार्कजवळ, दादर (पश्चिम)रावसाहेब पटवर्धन उद्यान, लिंकिंग रोड, वांद्रे (पश्चिम)लायन्स जुहू मुलांचे पालिका उद्यान, सांताक्रुझ (पश्चिम)किशोर कुमार बाग, जुहूराजेश खन्ना उद्यान, खार (पश्चिम)के. एल. वालावलकर उद्यान, ओशिवरामातोश्री मीनाताई ठाकरे शिल्पग्राम, जोगेश्वरी (पूर्व)हिरानंदानी उद्यान, पवईमाइंड स्पेस उद्यान, मालाड (पश्चिम)मीनाताई ठाकरे उद्यान, बोरीवली (पूर्व)एव्हरशाइन ड्रीम पार्कजवळील उद्यान, ठाकूर व्हिलेज, कांदिवली (पूर्व)मारुती मंदिर मैदान,मारुतीनगर, दहिसर (पूर्व)डायमंड उद्यान, चेंबूरसी.डी. देशमुख उद्यान, मुलुंड (पूर्व)सरदार प्रतापसिंह उद्यान, मुलुंड (पश्चिम)>संगीत सभांमध्ये १२० उदयोन्मुख कलाकारांद्वारे भारतीय शास्त्रीय संगीतातील सकाळच्या रागांवर आधारित गायन व वादन कला सादर करण्यात आली. या २० ठिकाणांपैकी काही ठिकाणच्या संगीत सभांमध्ये गायनाला प्राधान्य होते. साथीला वाद्य वादन होते. काही ठिकाणी आयोजित संगीत सभांमध्ये वाद्य वादनाला प्राधान्य होते. मलबार हिल परिसरातील कमला नेहरू उद्यानात महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे यांनी हजेरी लावली.- जितेंद्र परदेशी,उद्यान अधीक्षक, मुंबई महापालिका