मुंबईत मुली गायब होण्याचे प्रमाण वाढले; अपहरण, हरवलेल्या मुलींच्या संख्येत १५ पटींनी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 05:54 AM2018-04-18T05:54:06+5:302018-04-18T05:54:06+5:30

मुंबईत गेल्या पाच वर्षांत अल्पवयीन मुली गायब होण्याचे प्रमाण तब्बल १५ पटीने वाढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. माहिती अधिकारात समोर आलेल्या या माहितीप्रमाणे, मुंबईत सन २०१३ साली अपहरण आणि हरवलेल्या मुलींची संख्या ९२ इतकी होती, त्यात २०१७ साली १५ पटीने वाढ होऊन, २०१७ साली हा आकडा तब्बल १ हजार ३६८पर्यंत पोहोचला आहे.

 Mumbai's disappearance rises; Kidnapping, 15-fold increase in the number of missing girls | मुंबईत मुली गायब होण्याचे प्रमाण वाढले; अपहरण, हरवलेल्या मुलींच्या संख्येत १५ पटींनी वाढ

मुंबईत मुली गायब होण्याचे प्रमाण वाढले; अपहरण, हरवलेल्या मुलींच्या संख्येत १५ पटींनी वाढ

googlenewsNext

मुंबई : मुंबईत गेल्या पाच वर्षांत अल्पवयीन मुली गायब होण्याचे प्रमाण तब्बल १५ पटीने वाढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. माहिती अधिकारात समोर आलेल्या या माहितीप्रमाणे, मुंबईत सन २०१३ साली अपहरण आणि हरवलेल्या मुलींची संख्या ९२ इतकी होती, त्यात २०१७ साली १५ पटीने वाढ होऊन, २०१७ साली हा आकडा तब्बल १ हजार ३६८पर्यंत पोहोचला आहे. आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांना मुंबई पोलिसांनी ही माहिती दिली आहे.
गेल्या पाच वर्षांत एकूण ५ हजार ०५६ मुली हरवल्या किंवा अपहरण झाल्याचे समजते. मात्र, त्यांतील केवळ ४ हजार ६८६ मुलींचा शोध लागला असून, अद्यापही ३७० मुलींचा शोधच लागला नसल्याची गंभीर माहिती आहे. त्यात गेल्या पाच वर्षांतील हरवलेल्या आणि अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलांचा विचार केला असता, ३ हजार ३९० मुले गायब झाली होती. त्यातील ३ हजार १३१ मुले सापडली असून, २५९ मुलांचा थांगपत्ता लावण्यात पोलिसांना यश आलेले नाही.
अल्पवयीन मुला-मुलींशिवाय मुंबईतून गायब झालेल्या वयस्कांच्या बाबतीतही काही आश्यर्यकारक माहिती समोर आली आहे. त्यात २०१३ ते १७ दरम्यान मुंबईतून ६ हजार ५१० पुरुष आणि २ हजार ८३९ महिला हरवल्या आहेत. त्यांतील ५ हजार ३२२ पुरुष आणि २ हजार ३०९ महिलांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले. याउलट १ हजार १८८ पुरुष आणि ५३० महिलांचा शोध लागलेला नाही. अशाप्रकारे, ६२९ अल्पवयीन मुले आणि १ हजार ७१८ प्रौढ व्यक्तींचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. तरी अल्पवयीन मुले, महिलांच्या गायब होण्यामागे मानव तस्कर टोळ्यांचा हात आहे का? या संदर्भात गंभीर विचार करून, ठोस कार्यवाहीची मागणी शेख यांनी पोलीस आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.

तीन महिन्यांत १२३ मुलींवर बलात्कार
मुंबईत गेल्या ३ महिन्यांत १२३ अल्पवयीन मुली विकृत वासनेच्या शिकार ठरल्याची धक्कादायक माहिती मुंबई पोलिसांच्या आकडेवारीतून उघड झाली आहे. यांपैकी ११४ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.
दुसरीकडे याच कालावधीत मुंबईत ३६२ मुलींचे अपहरण झाल्याचेही उघड झाले आहे. त्यांपैकी २३५ मुली अजूनही बेपत्ता आहेत. त्यांच्यापर्यंत पोहचण्यास मुंबई पोलिसांना अद्याप यश आलेले नाही.

Web Title:  Mumbai's disappearance rises; Kidnapping, 15-fold increase in the number of missing girls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.