- शेफाली परब-पंडित मुंबई : फुकट प्रसिद्धीसाठी मुंबईभर होर्डिंग्ज लावत फिरणाऱ्या जाहिरातबाजांना वेसण घालण्यात महापालिकेचे नवीन धोरण कुचकामी ठरले आहे. मुंबईतील नाक्यानाक्यांवर रंगणाºया बॅनरबाजीने हायकोर्टाच्या आदेशालाही हरताळ फासला आहे. यामध्ये राजकीय पक्ष आघाडीवर असून त्यांच्या होर्डिंग्जबाजीने मुंबईचा चेहरा विद्रूप केला आहे.पालिकेच्या नियमानुसार शहरात २० बाय १० फूट तर उपनगरांमध्ये ४० बाय ४० फूट आकाराच्या होर्डिंग्जला परवानगी देण्यात येते. मात्र मुंबईत झळकणारी ७५ टक्के होर्डिंग्ज अनधिकृत असून यामध्ये राजकीय पक्षांच्या जाहिरातींचा प्रामुख्याने समावेश असतो. मतदारांना अथवा बड्या नेत्यांना खूश करण्यासाठी सण-समारंभ, उत्सवाच्या काळांमध्ये मुंबईत अशी जाहिरातबाजी रंगात येते. तर निवडणुकीच्या काळात विकासकामांचे श्रेय घेणे, आरोप-प्रत्यारोपांच्या बॅनरबाजीचे युद्ध रंगते.याची गंभीर दखल घेऊन उच्च न्यायालयाने अनेक वेळा महापालिकेला तसेच राजकीय पक्षांनाही फटकारले. दोन महिन्यांपूर्वीच अनधिकृत होर्डिंग्ज प्रकरणी भाजपा नगरसेवकाला न्यायालयाने फटकारले होते. अनधिकृत होर्डिंग्जवर निर्बंध आणण्यासाठी नवीन धोरणही तयार झाले. मात्र राजकीय बॅनरबाजीवर अंकुश ठेवणारी कोणतीच ठोस तरतूद नसल्याने मुंबईत जाहिरातबाजीला उधाण आले आहे.>होर्डिंग्जचा धोका...रेल्वे हद्दीतील होर्डिंग्ज - रेल्वेच्या हद्दीतील जाहिरात फलक कोसळून पुणे येथे झालेल्या अपघातात पाच नागरिकांचा मृत्यू झाला. मुंबईतही असे अनेक होर्डिंग नियमांचे उल्लंघन करून धोकादायक स्थितीत उभे आहेत. गजबजलेल्या मुंबईत झाड आणि पुलांप्रमाणे होर्डिंग कोसळल्यास मोठी जीवितहानी होऊ शकते.इमारतीवरील होर्डिंग्ज - सन २०१३ मध्ये माहिम येथील एक इमारत कोसळून दहा रहिवाशांचा मृत्यू झाला होता. या इमारतीवरील भल्यामोठ्या बेकायदा होर्डिंग्जच्या वजनाने इमारत कमकुवत झाली होती, असे उजेडात आले होते.वृक्षांची कत्तल - मुंबईत मोक्याच्या ठिकाणी आपली जाहिरातबाजी व्हावी यासाठी जाहिरातदार मोक्याचे ठिकाण शोधत असतात. मात्र या जाहिरात फलकाच्या दर्शनी भागी रस्त्यावरील झाडाची फांदी आल्यास ती फांदी बिनदिक्कत तोडली जाते. याची गंभीर दखल घेऊन जाहिरात फलकांना झाकणाºया झाडांच्या फांद्या छाटण्यापूर्वी महापालिकेचे ना हरकत प्रमाणपत्र घेणे नवीन धोरणात बंधनकारक करण्यात आले आहे.>...म्हणून राजकीय होर्डिंग्जला अभयअंधेरी मरोळ भागातील अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई करणाºया महापालिकेच्या कर्मचाºयांना भाजपा नगरसेवक व त्याच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची घटना दोन महिन्यांपूर्वी घडली. उच्च न्यायालयाने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. मात्र असे हल्ले पथकावर वारंवार घडतात. महापालिकेच्या पथकाला पोलिसांकडून संरक्षणही मिळत नाही, अशी तक्रार महापालिकेने उच्च न्यायालयाकडे केली होती. याबाबत विचारले असता, राजकीय पक्ष परवानगी न घेताच जाहिरात फलक लावतात. ते कोणताही नियम पाळत नाहीत, कारवाई करावी तर संरक्षणही मिळत नाही, अशी नाराजी एका अधिकाºयाने व्यक्त केली.कारवाई होणारच : कायदा करणाºया मंत्रालयाच्या परिसरातही होर्डिंग झळकत आहेत. याबाबत विचारले असता तत्काळ कारवाई करण्यात येईल, अशी हमी ए विभागाचे साहाय्यक आयुक्त किरण दिग्गावकर यांनी दिली. तर मुंबईत अनधिकृत होर्डिंग्जवर नियमित कारवाई सुरूच असते, असे उपायुक्त विजय बालमवार यांनी सांगितले.>होर्डिंग्जवर करण्यात आलेली कारवाई(जानेवारी ते आॅक्टोबर २०१८)प्रकार राजकीय व्यावसायिक धार्मिकबॅनर ३६२४ १०९५ १८२९बोर्ड २८४ ३२ १६७पोस्टर्स ० ४३० २५झेंडे ९८६ ० ०एकूण ४९१६ १५५७ २०२१कायदेशीर कारवाईएकूण कायदेशीर कारवाई - ७५१पोलीस ठाण्यात तक्रार - १८०९एफआयआर दाखल - ५७०
फुकट प्रसिद्धीसाठी लावण्यात आलेल्या राजकीय बॅनरबाजीत हरवला मुंबईचा चेहरा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2018 2:07 AM