मुंबई - मुंबईत आगी लागण्याच्या घटनांचे सत्र सुरूच असून, रविवारी पहाटे लोअर परळमधील शिवशक्ती इंडस्ट्रियल इस्टेट या तीन मजली इमारतीला आग लागली. ही आग इमारतीच्या पहिल्या मजल्यावर लागली होती. दरम्यान अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेचत आग नियंत्रणात आणली. याआधी याच परिसरातील कमला मिल परिसरातील दोन हॉटेल्सला लागलेल्या आगीत 14 जणांना आपला जीव गमवावा लागला होता.
दरम्यान, काल कांजूरमार्गमधील गांधीनगर भागात असणाऱ्या सिने विस्टा स्टुडिओला भीषण आग लागली होती. दोन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवायला फायर ब्रिगेडला यश आले होते. सिने विस्टा स्टुडिओला लागलेल्या आगीत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. मात्र येथील सेट पूर्णपणे जळून खाक झाले होते. आग लागलेल्या ठिकाणापासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावरूनही आग दिसत होती. बेपनहा या मालिकेचं शूटिंग सुरू असताना सिने विस्टा स्टुडिओला आग लागली. स्टुडिओमधील जनरेटरमध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागली असवी, अशी माहिती सध्या समोर येते आगेय 'शनिवारी संध्याकाळी आठ वाजता स्टुडिओला आग लागली. सात फायर ब्रिगेडच्या गाड्या व चार वॉटर टँकर तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. विशेष म्हणजे या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही पण मोठ्या प्रमाणात सामान जळून खाक झाले. सिनेविस्टा स्टुडिओमध्ये अनेक मालिकांचं शूटिंग होतं असतं. पाच एकर जमिनीवर सिनेविस्टा स्टुडिओ बांधण्यात आला आहे. या स्टुडिओमध्ये मालिकांसाठी तयार केलेले काही तात्पुरते तर काही कायमस्वरूपी असे सेट्स असून तीसपेक्षा जास्त शूटिंग लोकेशन्स आहेत. मालिका व सिनेमाच्या शूटिंगसाठी लागणारे कॅमेरे, लाइट्स अशा विविध साहित्याचं मोठं हबही या स्टुडिओमध्ये आहे.