येत्या दोन-चार वर्षांत मुंबईचे रुपडे पालटणार; स्वदेशी बनावटीच्या मेट्रो ट्रेनचे अनावरण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2021 04:46 AM2021-01-30T04:46:48+5:302021-01-30T04:47:03+5:30

बंगळुरूतून आलेल्या स्वयंचलित मेट्रोचे मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी चारकोप डेपोत अनावरण केले.

Mumbai's fortunes will change in the next two to four years; Unveiling of Indigenous Metro Train | येत्या दोन-चार वर्षांत मुंबईचे रुपडे पालटणार; स्वदेशी बनावटीच्या मेट्रो ट्रेनचे अनावरण

येत्या दोन-चार वर्षांत मुंबईचे रुपडे पालटणार; स्वदेशी बनावटीच्या मेट्रो ट्रेनचे अनावरण

Next

मुंबई : प्रत्येक दिवस विशेष असतो. आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. कारण नवी मेट्रो मुंबईत दाखल झाली आहे. येत्या दोन - चार वर्षांत मुंबईचे रुपडे पालटेल. कारण बेस्ट बसची संख्या १० हजार होईल. परवडणाऱ्या घरांसोबत परवडणारी वाहतूक व्यवस्था देण्याचा प्रयत्न आहे. मे महिन्यात मेट्रो सुरू होईल. कोस्टल रोडचे काम सुरू आहे. ही कामे पूर्ण करतानाच मागच्या सरकारने ज्या वेगाने काम केले त्यापेक्षा अधिक वेगाने काम करू, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

बंगळुरूतून आलेल्या स्वयंचलित मेट्रोचे मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी चारकोप डेपोत अनावरण केले. ब्रँडिंग मॅन्युअल, ट्रॅव्हल कार्ड, ऑपरेशनल कंट्रोल सेंट्रल, ग्रहण उप केंद्र, चारकोप आगार आणि रिसिव्हिंग सबस्टेशनचे उद्घाटनही या वेळी  झाले. मुख्यमंत्री म्हणाले, मेट्रो २ - अ आणि ७ मुळे मुंबईचा वेग वाढून लोकलवर येणारा ताण कमी हाेईल.

२०२६ पर्यंत सर्व मेट्रो प्रकल्प सुरू करण्याचे नियोजन
२०२६ पर्यंत सर्व मेट्रो प्रकल्प सुरू करण्याचे नियोजन आहे, असे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त आर. ए. राजीव म्हणाले. तर,  मेट्राेमुळे भविष्यात प्रवास सुखकर होईल. पर्यावरण संवर्धन  होईल. २०३१ पर्यंत सर्व मेट्रोंमधून १ कोटी प्रवासी प्रवास करतील, असे नगरविकासमंत्री  एकनाथ शिंदे यांनी सांगितले. 

Web Title: Mumbai's fortunes will change in the next two to four years; Unveiling of Indigenous Metro Train

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.