मुंबईचे भवितव्य मतपेटीत

By admin | Published: February 22, 2017 05:05 AM2017-02-22T05:05:57+5:302017-02-22T05:05:57+5:30

मुंबईत पहिल्यांदाच स्वबळावर उतरून आपली ताकद अजमावणाऱ्या राजकीय पक्षांचे भवितव्य ठरवणारा

Mumbai's future ballot box | मुंबईचे भवितव्य मतपेटीत

मुंबईचे भवितव्य मतपेटीत

Next

 मुंबई : मुंबईत पहिल्यांदाच स्वबळावर उतरून आपली ताकद अजमावणाऱ्या राजकीय पक्षांचे भवितव्य ठरवणारा दिवस आज उजाडला तोच उत्साहात़ मात्र मतदार याद्यांमधील घोळ, बंद पडलेल्या ईव्हीएम मशीन, अपंग व ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय अशा गोंधळाच्या वातावरणाने या उत्साहाला थोडा ब्रेक लावला़ त्यात बोगस मतदानाच्या तक्रारी, मतदारांवर लाठीमार आणि मुलुंडमध्ये आमदाराला धक्काबुक्की अशा घटनांनी तणाव वाढवला़ या काळात सट्टाबाजारही तेजीत आला़, तर दुसरीकडे वासुदेव आणि परदेशी हेअरस्टायलिस्टच्या अभिनव उपक्रमाने मतदारांना आपल्या कर्तव्याची जाणीव करून दिली़ आणि शेवटच्या दोन तासांत गेल्या दोन दशकांचे रेकॉर्ड ब्रेक करीत मतदानाने पन्नाशी पार केली़
सेलीब्रिटींचे आवाहन, निवडणूक आयोगाची जनजागृती मोहीम अशा अनेक उपक्रमांनंतरही गेल्या २० वर्षांत मतदानाचा टक्का ४२ ते ४६ यामध्येच फिरत राहिला़ २०१२ मध्ये हा टक्का घसरून ४४ टक्क्यांवर आला होता़ त्यामुळे राज्य निवडणूक आयोग व महापालिकेने मतदारांना प्रोत्साहन देणारे अनेक उपक्रम हाती घेतले होते़ प्रत्यक्षात मात्र मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर गोंधळाचे वातावरण होते़ प्रभाग फेररचनेनंतर मिळालेल्या नवीन याद्यांमध्ये एकाचेच नव्हे तर संपूर्ण इमारत व परिसरातील मतदारांची नावे गायब असल्याचे उजेडात आले़ या गोंधळामुळे मानखुर्द न्यू म्हाडा कॉलनी येथे  संतप्त जमावावर पोलिसांनी लाठीमार केला़
मतदार याद्यांमधील हा गोंधळ सर्वच प्रभागांमध्ये दिसून आला़ त्यात निवडणूक आयोगाकडून वाटण्यात येणाऱ्या चिठ्ठ्यांचा व त्यावरील खोली क्रमांकामध्येही गडबड होती़ यामुळे अनेक मतदारांचा हक्क हुकला़ भांडुप, मुलुंड, विक्रोळी, कांजूरमार्ग येथील बोगस मतदानाच्या तक्रारींमुळे मतदान बंद करण्याची मागणी राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून होऊ लागली़ अशा परिस्थितीत दुपारी ११़३० पर्यंत १६ टक्केच मतदान झाले़ यामुळे उमेदवारांची धाकधूक वाढली़ मात्र शेवटच्या दोन तासांत काही ठिकाणी कार्यकर्त्यांची यंत्रणा कामाला लागून मतदारांना मतदान केंद्रांपर्यंत आणण्यात आले़ परिणामी शेवटच्या टप्प्यात मतदानाचा स्कोअर ५० वर पोहोचला़ (प्रतिनिधी)

पक्षनिहाय उमेदवार

शिवसेना २२७
भाजपा २११
काँग्रेस २२१
राष्ट्रवादी १७१
मनसे २०१
समाजवादी ७६
सी़पी़ (आय) १०
सी़पी़ (एम) ११
जे़डी़एस़ १०
एल़पी़ ०१
एआयएडीएमके ०३
एआयएमआयएम ५६
अन्य पक्ष २५१
अपक्ष ७१७
एकूण २२७५

Web Title: Mumbai's future ballot box

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.