लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. अशातच मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी मलबार हिल येथील आपल्या शासकीय निवासस्थानी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत नागरिक नियमांचे उल्लंघन करीत राहिल्यास व कोरोना रुग्णांच्या संख्येत अशाच प्रकारे झपाट्याने वाढ होत राहिल्यास शेवटचा मार्ग म्हणून नाइलाजाने लाॅकडाऊनचा विचार करावा लागेल, असे म्हटले आहे.
अस्लम शेख यांनी सांगितले की, आम्ही क्रमाक्रमाने निर्बंध कडक करीत आहोत. जनतेच्या हितासाठी आदर्श कार्यप्रणालीदेखील आखून देण्यात आलेली आहे. नागरिकांच्या प्राणांचे रक्षण हीच आमची प्राथमिकता आहे. शासनातर्फे जाहीर करण्यात आलेल्या आदर्श कार्यप्रणालीचे नागरिकांनी कोटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे
मुंबईमध्ये सरकारी इस्पितळांमध्ये लसीकरण प्रभावीपणे चालू आहे, अशी माहिती त्यांनी दिली.