CoronaVirus News: राज्यात सलून, व्यायामशाळा होणार सुरु; राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2020 04:55 PM2020-06-25T16:55:18+5:302020-06-25T17:21:28+5:30

राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक बोलवण्यात आली होती.

Mumbai's Guardian Minister Aslam Sheikh has informed that the gymnasium and salon will start from June 28 | CoronaVirus News: राज्यात सलून, व्यायामशाळा होणार सुरु; राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

CoronaVirus News: राज्यात सलून, व्यायामशाळा होणार सुरु; राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

googlenewsNext

मुंबई: लॉकडाऊनच्या काळात बंद असलेल्या व्यायमशाळा आणि सलून सुरु करण्याबाबत  राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय झाला आहे. येत्या २८ जूनपासून व्यायामशाळा आणि सलून सुरु होईल, अशी माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे.

राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीमध्ये सलूनचा व्यावसाय सुरु करण्याबाबत चर्चा झाली. यानंतर कोरोनाची विभागवार परिस्थिती लक्षात घेऊन सलून व्यावसाय सुरु करण्यात येणार आहे. तसेच याबाबत सरकारकडून लवकरच मार्गदर्शक तत्त्वे जारी केली जातील, असं अस्लम शेख यांनी सांगितले.

सलूनमध्ये फक्तं केस कापण्याची परवानगी असेल. दाढी करण्याची परवानगी सध्या नाही. केस कापणाऱ्याने आणि कापून घेणारे दोघांनाही मास्क बंधनकारक असेल, अशी माहिती मंत्री आणि शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी दिली.

राज्यात सलून सुरू करण्यास हिरवा कंदील दाखवण्यात आला असला तरी ब्युटी पार्लर आणि स्पा सुरू करण्यास मात्र तूर्त परवानगी देण्यात आलेली नाही. राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत सलूनबाबत विविध विषयांवर चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्यात आला. सलूनसाठी नियमावली तयार करण्यात येणार असून सोशल डिस्टन्सिंगचं पालन, मास्कचा वापर, सॅनिटाइझ करणे बंधनकारक असल्याचे सांगण्यात येत आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या टाळेबंदीचा राज्यातील लाखो सलून व्यावसायिकांना फटका बसला आहे. अनेकांवर त्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे या व्यावसायिकांना सोशल डिस्टसिंग तसेच स्वच्छतेचे नियम पाळून आपला व्यवसाय सुरु करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी सलून चालकांकडून करण्यात येत होती.

अन्य महत्वाच्या बातम्या-

शरद पवारांवरील वादग्रस्त विधानानंतर रोहित पवारांचा पडळकरांना 'सॉलिड' सल्ला

"जरा तोंड सांभाळून बोललं तर बरं होईल"; राष्ट्रवादीचा पडळकरांना थेट इशारा

"भाजपा आमदारांच्या अंगावर गेलात तर..."; पडळकरांच्या विधानावरून वाद चिघळला

मोदींच्या महत्त्वाच्या मोहिमेत अमेरिकेची आडकाठी; 'टेक ऑफ'साठी घातल्या अटी

CoronaVirus News: रामदेव बाबांच्या 'कोरोनिल' औषधावर ठाकरे सरकारने दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

CoronaVirus News: जाहिरात थांबवा, आधी 'त्या' औषधाची सविस्तर माहिती द्या; आयुष मंत्रालयाचा पतंजलीला आदेश

Read in English

Web Title: Mumbai's Guardian Minister Aslam Sheikh has informed that the gymnasium and salon will start from June 28

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.