मुंबईकरांचा ताप कायम !

By admin | Published: December 10, 2014 02:16 AM2014-12-10T02:16:18+5:302014-12-10T02:16:18+5:30

डिसेंबर उजाडूनही मुंबईकरांचा ताप उतरलेला नाही. डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ात डेंग्यूचे 17 रुग्ण आढळले आहेत.

Mumbai's heat continues! | मुंबईकरांचा ताप कायम !

मुंबईकरांचा ताप कायम !

Next
मुंबई : डिसेंबर उजाडूनही मुंबईकरांचा ताप उतरलेला नाही. डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ात डेंग्यूचे 17 रुग्ण आढळले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेतर्फे डिसेंबर महिन्यात डेंग्यू रुग्णांत घट होईल, असे स्पष्ट केले होते. पण परिस्थिती वेगळी दिसत आहे. पूर्ण डिसेंबर महिन्यात डेंग्यूचे 2क्-25 रुग्ण आढळतील असा अंदाज होता. पण पहिल्या आठवडय़ात 17 डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत. 
नोव्हेंबर महिन्यात डेंग्यूचे एकूण 146 रुग्ण आढळले आहेत. डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ात तापाचे 1 हजार 511  रुग्ण आढळून आले असून, नोव्हेंबर महिन्यात 8 हजार 566 रुग्ण आढळले होते. तर मलेरियाचे 132 रुग्ण आढळले आहेत.  थंडी पडल्यावर साथीचे आजार आटोक्यात येतील, असे डॉक्टरांचे मत होते. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवडय़ापासून मुंबईत थंडी पडायला सुरुवात झाली आहे. यामुळे डेंग्यूचे रुग्ण कमी होतील, असा अंदाज वर्तवण्यात आला होता; पण प्रत्यक्षात चित्र मात्र उलटे आहे. (प्रतिनिधी)

 

Web Title: Mumbai's heat continues!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.