मुंबईची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:11 AM2021-08-17T04:11:16+5:302021-08-17T04:11:16+5:30

मागील वर्षांनंतर पहिल्यांदाच रुग्णसंख्येत मोठी घट लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबईत कोरोनाची दुसरी लाट संपत असून संसर्गाची तीव्रता ...

Mumbai's journey towards coronation | मुंबईची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल

मुंबईची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल

Next

मागील वर्षांनंतर पहिल्यांदाच रुग्णसंख्येत मोठी घट

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईत कोरोनाची दुसरी लाट संपत असून संसर्गाची तीव्रता दिवसागणिक कमी होत आहे. मागील काही दिवसांत शहर-उपनगरातील दैनंदिन रुग्ण व मृत्युसंख्येत कमालीची घट झाली असून मुंबई आता कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करत आहे. कोरोना संसर्गाच्या सुरुवातीपासून म्हणजेच एप्रिल २०२० पासून पहिल्यांदाच मुंबईतील दैनंदिन रुग्णसंख्या २०० च्या आत असल्याची नोंद आहे.

शहर-उपनगरात सोमवारी १९० रुग्ण आणि ३ मृत्यूंची नोंद झाली आहे, तर सध्या २ हजार ४७९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

मुंबईत दिवसभरात २७१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्णदुपटीचा कालावधी वाढत असून १ हजार ६६ दिवसांवर पोहोचला आहे. ९ ते १५ ऑगस्टपर्यंत मुंबईतील एकूण कोविडवाढीचा दर ०.०४ टक्के आहे.

मुंबईत कोरोनाग्रस्तांचा आकडा ७ लाख ३९ हजार ५२६ वर तर मृतांचा आकडा १५ हजार ९९२ वर पोहोचला आहे. आतापर्यंत एकूण ७ लाख १८ हजार ३५४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. शहर-उपनगरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के झाले आहे

मुंबईत चाळ व झोपडपट्टीच्या परिसरात एकही प्रतिबंधित क्षेत्र नाही तर २१ इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी ३५ हजार ४८४ तर आतापर्यंत एकूण ८६ लाख ७८ हजार ७४६ चाचण्या करण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

Web Title: Mumbai's journey towards coronation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.