पुण्याला पुरेल एवढे मुंबईच्या गळतीचे प्रमाण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2018 02:55 AM2018-10-26T02:55:12+5:302018-10-26T02:55:21+5:30

मुंबईची सध्याची पाण्याची मागणी ४७७० दशलक्ष लीटर एवढी आहे. भातसा, तानसा, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, तुळशी, मोडकसागर, विहार या स्रोतांतून ३९८० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होत असून मुंबईला दररोज ७९० दशलक्ष लीटर पाण्याचा तुटवडा जाणवत आहे.

Mumbai's leak proof | पुण्याला पुरेल एवढे मुंबईच्या गळतीचे प्रमाण

पुण्याला पुरेल एवढे मुंबईच्या गळतीचे प्रमाण

Next

मुंबई : मुंबईची सध्याची पाण्याची मागणी ४७७० दशलक्ष लीटर एवढी आहे. भातसा, तानसा, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, तुळशी, मोडकसागर, विहार या स्रोतांतून ३९८० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होत असून मुंबईला दररोज ७९० दशलक्ष लीटर पाण्याचा तुटवडा जाणवत आहे. एवढीच मुंबईत पाणीगळती आहे. अख्ख्या पुणे शहराला पुरेल एवढे हे गळतीचे प्रमाण आहे. यातील तुळशी आणि विहारवगळता सर्वच धरणे ठाणे-पालघर जिल्ह्यांत आहेत. तेथील शेतकऱ्यांच्या हजारो हेक्टर शेतजमिनीसह वनजमीन त्याखाली गेलेली आहे.
भविष्यात मुंबई शहर ज्या भागात सरकत आहे, त्या कर्जत-खालापूर-खोपोली भागाची पाण्याची सध्याची मागणी ३६ दशलक्ष लीटर असून या परिसराला उल्हास खोºयातून २४ दशलक्ष लीटर पाणीपुरठा होत असल्याने १२ दशलक्ष लीटर पाण्याचा तुटवडा आहे. कर्जत-खोपोलीच्या विकासामुळे अन् मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर भविष्यात विकसित होणाºया नगर वसाहतींमुळे पाण्याची मागणी वाढणार आहे.
नवी मुंबई विमानतळामुळे ज्या पनवेल, खोपटानगराचा विकास होणार आहे, त्या परिसराची सध्याची पाण्याची गरज ४४ दशलक्ष लीटर आहे. या परिसराला पाताळगंगासह स्थानिक स्रोतांतून १७ दशलक्ष लीटर पाणी मिळत असून २७ दशलक्ष लीटर पाण्याचा तुटवडा आहे. विमानतळ, सेझ, न्हावाशेवा-शिवडी सी लिंक, रेवस-आवरे बंदर यामुळे या परिसराचा येत्या काळात झपाट्याने विकास होणार आहे.
शहापूरसारखा तालुका अख्ख्या मुंबईची तहान भागवत असताना तेथील आदिवासींना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. मुंबई महानगर प्रदेशातील कोणत्याच गावाला केंद्रीय सार्वजनिक आरोग्य व पर्यावरण विभागाच्या मानकानुसार रोज दरडोई ७० लीटर पाण्याचा पुरवठा होत नाही. सुमारे ६० टक्के गावांना ४० ते ६९ लीटर, २४ टक्के गावांना ४० लीटरच्या खाली तर मुंबईच्या जलवाहिन्या गावांतून जातात त्यांना अवघा २७ टक्के पाणीपुरवठा होत आहे.
>संभाव्य जलस्रोत
मुंबई महानगर प्रदेशाची भविष्यातील वाढत्या लोकसंख्येची तहान भागवण्यासाठी पिंजाळ, गारगाई, सुसरी, काळू, कवडास, शाई, पोशीर ही जलसंपदा विभागाची प्रस्तावित धरणे ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत आकार घेणार असून त्यासाठी ठाणे-पालघर जिल्ह्यांतील हजारो हेक्टर शेतजमिनीसह वनजमीन जाणार आहे.
हजारो शेतकरी भूमिहीन होणार असून लक्षावधी वृक्षांची कत्तल होणार आहे. हा सर्व आघात ठाणे-पालघर जिल्ह्यांवर होणार असून केंद्रीय मंत्री गडकरी ठाणेकरांना तहानलेले ठेवून नाशिक-अहमदनगरसाठी नव्या धरणांची काळजी वाहू लागले आहेत.

Web Title: Mumbai's leak proof

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.