... तर 6 ऑगस्टपासून मुंबईची 'बेस्ट' लाईफलाईन बंद, कर्मचारी पुन्हा संपावर 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2019 07:54 PM2019-07-22T19:54:58+5:302019-07-22T19:59:06+5:30

मुंबई उच्च न्यायालयाने, 2007 पासून बेस्ट उपक्रमात समावेश झालेल्या कर्मचाऱ्यांना 10 वेतनवाढी, देण्याचे आणि 1 जानेवारीपासून अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले होते.

... Mumbai's Lifeline will stop, 'best' employees will strike again From 6 august | ... तर 6 ऑगस्टपासून मुंबईची 'बेस्ट' लाईफलाईन बंद, कर्मचारी पुन्हा संपावर 

... तर 6 ऑगस्टपासून मुंबईची 'बेस्ट' लाईफलाईन बंद, कर्मचारी पुन्हा संपावर 

Next

मुंबई - 6 ऑगस्टपासून बेस्ट कर्मचारी संपावर जाणार आहेत. कामगार संघटनेनं प्रशासनाला याबाबत पत्र दिले आहे. कामगारांच्या पगाराचा प्रश्न उपस्थित करत, बेस्ट प्रशासनाला दबीईएसटी संघटनेने संपाचा इशारा दिला आहे. बेस्ट युनियनने 16 मे 2016 रोजी बेस्टच्या महाव्यवस्थापकांची भेट घेऊन केलेल्या मागण्यांची पूर्तता अद्याप झाली नसल्याचे सांगत हा संप करण्याचा इशारा संघटनेनं दिला आहे.  

मुंबई उच्च न्यायालयाने, 2007 पासून बेस्ट उपक्रमात समावेश झालेल्या कर्मचाऱ्यांना 10 वेतनवाढी, देण्याचे आणि 1 जानेवारीपासून अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार अंमलबजावणीही झाली, परंतु मध्यस्थीनंतर पुन्हा ही मुंबई उच्च न्यायालयात असफल अहवाल दाखल करण्यात आला आहे. तर मधल्याकाळाच लोकसभेच्या निवडणुकांमुळे आचारसंहितेच्या कारणास्तव चर्चा होऊ शकल्या नसल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या मागण्या मान्य कराव्या, यासाठी बेस्ट कर्मचारी संपावर जात आहेत. 

* बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या

* बेस्ट उपक्रमचा क अर्थसंकल्प मनपाच्या अ अर्थसंकल्पात विलिन करण्याबाबत मंजूर झालेल्या ठरावाची अंमलबजावणी करावी. 
* सन 2007 पासून बेस्ट उपक्रमात भरती झालेल्या कर्मचाऱ्यांची रुपये 7930 ने सुरू होणाऱ्या मास्टर ग्रेडमध्ये पूर्वलक्षी प्रभावाने त्वरीत वेतन निश्चित करावी. 
* एप्रिल 2016 पासून लागू करायवयाच्या नवीन वेतन करारावर तातडीने वाटाघाटी सुरू कराव्यात. 
* सन 2016-17 व 2017-18 करिता म.न.पा. कर्मचाऱ्याइतका बोनस द्यावा. 
* कर्मचारी सेवा निवासस्थानांचा प्रश्न तातडीने सोडवावा
अनुकंपा भरती तातडीने सुरू करा. 
या मागण्यांसाठी बेस्टचे कर्मचारी 6 ऑगस्टपासून संपावर जाणार आहेत. 



 

Web Title: ... Mumbai's Lifeline will stop, 'best' employees will strike again From 6 august

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.