Join us

मुंबईचा पारा घसरतोय! हुडहुडी वाढली, तापमान २० अंशावर

By सचिन लुंगसे | Published: December 14, 2023 7:59 PM

किमान तापमानात घट नोंदविण्यात येत असल्याने मुंबईकरांनाही थंडीचा किंचित का होईना फिल येत असल्याचे चित्र आहे.

मुंबई : राज्यभरातील बहुतांशी शहरांचे किमान तापमान १५ अंशाच्या आसपास येऊन ठेपले असून, मुंबईही २० अंशावर आली आहे. किमान तापमानात घट नोंदविण्यात येत असल्याने मुंबईकरांनाही थंडीचा किंचित का होईना फिल येत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, हुडहुडी भरविणा-या थंडीसाठी नागरिकांना डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्याची वाट पाहवी लागणार आहे.

मुंबईचे किमान तापमान खाली उतरत असून, आता २० अंश नोंदविण्यात येत आहे. बुधवारी किमान तापमानाचा पारा १९.४ अंश नोंदविण्यात आला. यंदाच्या मौसमातील आतापर्यंतचे हे सर्वात कमी किमान तापमान होते. मुंबईत दुपारी उन्हाचा तडाखा कायम असला तरी पहाटे आणि रात्री किंचित गारवा जाणवत आहे.

किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये

  • अहमदनगर १४.३
  • छत्रपती संभाजी नगर १४.६
  • बीड १५.२
  • जळगाव १५
  • महाबळेश्वर १३.५
  • मुंबई २०.५
  • नाशिक १४.२
  • परभणी १५.५
  • सातारा १५.३
  • पुणे १४
  • गोंदिया १३.२
  • नागपूर १४.४
टॅग्स :मुंबई