Join us  

मुंबईची मेट्रो वाचवतेय पाणी...

By admin | Published: May 12, 2016 3:03 AM

राज्यासह मुंबईत पाण्याचे महत्त्व विषद करून जल बचतीचे धडे दिले जात असतानाच मुंबईच्या उपनगरात वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मार्गावर धावणारी मेट्रो रेल्वेदेखील स्वच्छता

मुंबई : राज्यासह मुंबईत पाण्याचे महत्त्व विषद करून जल बचतीचे धडे दिले जात असतानाच मुंबईच्या उपनगरात वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मार्गावर धावणारी मेट्रो रेल्वेदेखील स्वच्छता आणि इतर कामांसाठी पाण्याचा पुनर्वापर करण्यावर भर देत आहे.वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मार्गावर दररोज १६ मेट्रो धावत आहेत. या मेट्रो डी.एन.नगर येथील डेपोमध्ये धुण्यात येतात. एक मेट्रो धुण्यासाठी १,२०० लीटर पाणी वापरण्यात येत आहे. त्यापैकी एक हजार लीटर पाण्यावर पुनर्प्रक्रिया केली जात आहे. मुंबई मेट्रो धुण्यासाठी आॅटोमेटीक वॉशिंग प्लांट आहे. त्यामुळे अधिकाधिक पाण्याची बचत केली जात आहे.मेट्रोचा आतील भाग धुण्यासाठी एका मेट्रोकरिता २०० लीटर पाणी वापरले जात आहे. अधिकाधिक पाण्याची बचत व्हावी म्हणून मेट्रोच्या आतील भागाला कोटिंग करण्यात आले आहे आणि हा कोटिंग केलेला भाग धुण्याऐवजी ओल्या कपड्याने पुसून काढला जात आहे. त्यामुळे अधिकाधिक पाण्याची बचत होत आहे. डी. एन. नगर डेपोमध्ये पर्जन्य जलसंधारण यंत्रणा कार्यान्वित असून, येथे जलप्रक्रिया कारखाना आहे. त्यामुळे ज्या पाण्यावर पुनर्प्रक्रिया केली जाते ते पाणी येथील शौचालय व इतर कामांसाठी वापरले जात असून, यामध्ये आणखी सुधारणा करण्यावर मुंबई मेट्रोचा भर आहे. (प्रतिनिधी)