मुंबई : उत्तर भारताकडून दक्षिण भारताकडे शीत वारे वाहत असून, याचा परिणाम म्हणून मुंबईसह महाराष्ट्र चांगलाच गारठला आहे. गुरुवारी मुंबईचे किमान तापमान १२.४ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले असून, या मोसमातील हे नीचांकी किमान तापमान आहे. तर गुरुवारी राज्यात सर्वात कमी किमान तापमान नाशिक येथे ५़७ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे़ पंजाबमधील अमृतसर येथे किमान तापमान १ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे़मुंबई आणि उपनगरातील अनेक परिसरांचे किमान तापमान १५ अंशाखाली नोंदविण्यात आले आहे. गुरुवारचे किमान तापमान सरासरी १२.४ इतके नोंदविण्यात आले असून, किमान तापमानाच्या तुलनेत ते ५ अंशांनी खाली घसरले आहे. मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरातील गोरेगाव, कांदिवली, आकुर्ली, बोरीवली, पवई, भांडुप आणि पनवेल या परिसराचे किमान तापमान १५ अंशाखाली नोंदविण्यात आले आहे. अंधेरी, चारकोप, जोगेश्वरी, मुलुंड या परिसराचे किमान तापमान १५ अंशाच्या आसपास नोंदविण्यात आले आहे.राज्याचा विचार करता राज्यातील बहुतांश शहरांचे किमान तापमान १० ते १५ अंशाच्या आसपास नोंदविण्यात आले आहे. काही शहरांचा किमान तापमानाचा पारा थेट १० अंशाखाली घसरला आहे. सागरी किनाऱ्यालगतच्या शहरांच्या किमान तापमानात चांगलीच घट नोंदविण्यात आली असून, उत्तर मध्य महाराष्ट्र कमालीचा गारठला आहे.निफाडमध्ये तापमान १.८नाशिक : राज्यात नाशिक जिल्ह्यातील निफाड सर्वाधिक थंडीचा कडाका असलेले शहर म्हणून गुरुवारी (दि.२७) नोंदविले गेले. सकाळी हवामान केंद्राकडून निफाडचे किमान तापमान १.८ अंश तर नाशिकचे ५.७ अंश मोजण्यात आले. ही नोंद हंगामातील सर्वात नीचांकी ठरली.नाशिक, अहमदनगरमध्ये थंडीची लाटहिमालयाकडून वाहणाºया शीत वाºयामुळे पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. याचा परिणाम म्हणून उत्तर महाराष्ट्रात गारठा वाढला असून, मुंबईसह राज्यातील बहुतांशी शहरांचे किमान तापमान घसरले आहे. २८ व २९ डिसेंबर रोजी नाशिक व अहमदनगर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी थंडीची लाट येईल, असे मुंबई प्रादेशिक हवामान खात्याचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले.
मुंबईचे किमान तापमान १२ अंशांवर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2018 7:17 AM