गुजरातच्या हवेने मुंबईत गारवा आणला, मुंबापुरी कमालीची गारठली

By सचिन लुंगसे | Published: January 25, 2024 08:39 PM2024-01-25T20:39:31+5:302024-01-25T20:39:51+5:30

उत्तर भारतातून गुजरातमार्गे मुंबईत दाखल होत असलेल्या गार वा-यामुळे मुंबापुरी कमालीची गारठली असून, आल्हादायक वातावरण आणखी दोन दिवस राहील, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे.

Mumbai's minimum temperature has been recorded at 17 degrees on Thursday | गुजरातच्या हवेने मुंबईत गारवा आणला, मुंबापुरी कमालीची गारठली

गुजरातच्या हवेने मुंबईत गारवा आणला, मुंबापुरी कमालीची गारठली

मुंबई : उत्तर भारतातून गुजरातमार्गे मुंबईत दाखल होत असलेल्या गार वाऱ्यामुळे मुंबापुरी कमालीची गारठली असून, आल्हादायक वातावरण आणखी दोन दिवस राहील, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. गुरुवारी मुंबईचे किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले आहे. किमान तापमानाचा पारा आणखी दोन दिवस कायम राहील. त्यानंतर तापमानात किंचित वाढ होईल. १ फेब्रूवारीनंतर पुन्हा तापमान खाली येईल; आणि थंडीचा जोर वाढेल. १५ फेब्रूवारीपर्यंत असेच काहीसे वातावरण राहणार असल्याने मुंबईकरांची काही दिवस तरी उकड्यातून सुटका होणार आहे.

मुंबईसह कोकणात पहाटेचे किमान तापमान हे १४ तर दुपारचे कमाल तापमान ३० म्हणजे  दोन्हीही तापमाने सरासरी इतके तर काही भागात सरासरीपेक्षा एखाद्या डिग्रीने कमी असु शकतात. महाराष्ट्रसारखीच गुजरातमध्येही चांगलीच थंडी जाणवत असून, म्हणून तर मुंबईही गारठली आहे. आकाश निरभ्र राहून थंडी १ फेब्रुवारीपर्यंत अशीच असणार आहे, अशी माहिती हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.

किमान तापमान

पुणे ८.६
नाशिक ८.६
जळगाव ९.३
छत्रपती संभाजी नगर ९.४
मालेगाव ९.४
जेऊर १०.५
परभणी १०.९
जालना ११
महाबळेश्वर ११
सातारा ११.३
धाराशीव १३.४
नांदेड १३.८
सांगली १३.८
अलिबाग १४.१
सोलापूर १४.८
डहाणू १५
कोल्हापूर १५
पालघर १५.९
माथेरान १६.२
मुंबई १७.८
रत्नागिरी १८.१

Web Title: Mumbai's minimum temperature has been recorded at 17 degrees on Thursday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.