Join us

गुजरातच्या हवेने मुंबईत गारवा आणला, मुंबापुरी कमालीची गारठली

By सचिन लुंगसे | Published: January 25, 2024 8:39 PM

उत्तर भारतातून गुजरातमार्गे मुंबईत दाखल होत असलेल्या गार वा-यामुळे मुंबापुरी कमालीची गारठली असून, आल्हादायक वातावरण आणखी दोन दिवस राहील, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे.

मुंबई : उत्तर भारतातून गुजरातमार्गे मुंबईत दाखल होत असलेल्या गार वाऱ्यामुळे मुंबापुरी कमालीची गारठली असून, आल्हादायक वातावरण आणखी दोन दिवस राहील, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. गुरुवारी मुंबईचे किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले आहे. किमान तापमानाचा पारा आणखी दोन दिवस कायम राहील. त्यानंतर तापमानात किंचित वाढ होईल. १ फेब्रूवारीनंतर पुन्हा तापमान खाली येईल; आणि थंडीचा जोर वाढेल. १५ फेब्रूवारीपर्यंत असेच काहीसे वातावरण राहणार असल्याने मुंबईकरांची काही दिवस तरी उकड्यातून सुटका होणार आहे.मुंबईसह कोकणात पहाटेचे किमान तापमान हे १४ तर दुपारचे कमाल तापमान ३० म्हणजे  दोन्हीही तापमाने सरासरी इतके तर काही भागात सरासरीपेक्षा एखाद्या डिग्रीने कमी असु शकतात. महाराष्ट्रसारखीच गुजरातमध्येही चांगलीच थंडी जाणवत असून, म्हणून तर मुंबईही गारठली आहे. आकाश निरभ्र राहून थंडी १ फेब्रुवारीपर्यंत अशीच असणार आहे, अशी माहिती हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.किमान तापमान

पुणे ८.६नाशिक ८.६जळगाव ९.३छत्रपती संभाजी नगर ९.४मालेगाव ९.४जेऊर १०.५परभणी १०.९जालना ११महाबळेश्वर ११सातारा ११.३धाराशीव १३.४नांदेड १३.८सांगली १३.८अलिबाग १४.१सोलापूर १४.८डहाणू १५कोल्हापूर १५पालघर १५.९माथेरान १६.२मुंबई १७.८रत्नागिरी १८.१