Join us

मुंबईकरांचे पार्किंग झाले महाग

By admin | Published: January 03, 2015 12:51 AM

मुंबईत आजच्या घडीला २० लाख वाहनं असून, दरवर्षी यामध्ये ७ ते ८ टक्के वाढ होत आहे़ खाजगी वाहनांची संख्या सर्वाधिक आहे़ मात्र या तुलनेत मुंबईत फक्त ९२ वाहनतळ आहेत़

प्रस्तावाला महासभेत मंजुरी : बेस्ट भाडेवाढीपाठोपाठ पार्किंगचे संकटपार्किंगची वाढती समस्यामुंबईत आजच्या घडीला २० लाख वाहनं असून, दरवर्षी यामध्ये ७ ते ८ टक्के वाढ होत आहे़ खाजगी वाहनांची संख्या सर्वाधिक आहे़ मात्र या तुलनेत मुंबईत फक्त ९२ वाहनतळ आहेत़ यामध्ये एका वेळी १० हजार ३०४ वाहनं उभी राहू शकतात़ वाढत्या खाजगी वाहनांमुळे २०२१ मध्ये वाहनांचा आकडा ९० लाखांपर्यंत पोहोण्याची शक्यता व्यक्त होत आहे़पार्किंगचे धोरण कशासाठी?मुंबईतील दीड कोटी जनता बस व रेल्वेतून दररोज प्रवास करीत असते़ उर्वरित १५ ते २० टक्के खाजगी वाहनांतून प्रवास करतात़ अशा श्रीमंतांची वाहनं रस्त्याच्या कडेला उभी राहिल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत असतो़ त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजू अडविणाऱ्या या श्रीमंतांकडून पार्किंग शुल्क वसूल करण्यासाठी पालिकेने हे धोरण आणले असल्याचा दावा प्रशानाने केला आहे़ मात्र लालबाग, परळ, करी रोड, चिंचपोकळी येथील चाळी व जुन्या इमारतींमध्ये राहणाऱ्या मराठी माणसाला याचा फटका बसणार असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे़पर्यटनाला प्रोत्साहन : चौपाटी, गेट वे आॅफ इंडिया, म्युझियम, जुहू चौपाटी अशा पर्यटनस्थळी सुटीच्या दिवशी पार्किंग मोफत असणार आहे़सार्वजनिक परिवहनला प्रोत्साहन : खाजगी वाहनांची संख्या कमी होण्यासाठी कार व ट्रकमालकाकडून जास्त शुल्क व रिक्षा, टॅक्सी अशा सार्वजनिक परिवहनांना सवलतीच्या दरामध्ये पार्किंगची सुविधा उपलब्ध होणार आहे़ उदा़ खाजगी वाहनासाठी ४० रुपये आकारल्यास सार्वजनिक वाहनाला केवळ १० ते २० रुपये मोजावे लागतील़नाइट पार्किंग : निवासी इमारतींच्या प्रवेशद्वाराबाहेरील रस्त्यांवर गाड्या उभ्या केल्या जातात़ या वाहनांच्या पार्किंगसाठी रात्री ८ ते सकाळी ८ अशी वेळ निश्चित केली जाणार आहे़ यासाठी मासिक पास देण्यात येईल, ज्याचे नूतनीकरण दरवर्षी होईल़ या पार्किंगची किंमत नियमित मासिक पासाच्या एकतृतीयांश असणार आहे़ त्यानुसार दरमहा १,३०० ते ४,००० हजार रुपये आकारण्यात येणार आहेत़ बहुमजली पार्किंग : लॉटच्या १०० मीटर परिसरात गाडी उभी करण्यासाठी चारपट रक्कम मोजावी लागणार आहे़ तसेच बेकायदा पार्किंगसाठी ५० रुपये दंड आकारण्यात येणार असून, यावर नजर ठेवण्यासाठी मार्शल्स नियुक्त केले जाणार आहेत़च्नवीन धोरण पुढील दोन वर्षांसाठी असणार आहे़ त्यानुसार गजबजलेल्या महत्त्वाच्या ठिकाणी पार्किंगचे दर वाढणार आहेत़ वर्दळीची वेळ व वर्दळ नसलेल्या वेळेनुसार दरांमध्ये बदल असणार आहेत़च्सुरुवातीला दोन वर्षांसाठी असलेल्या पार्किंगच्या दरामध्ये प्रत्येक दोन वर्षांनी १० टक्क्यांची वाढ होणार आहे़ या दरवाढीचा फटका ९० टक्के खाजगी वाहनमालकांना बसणार आहे़च्पूर्वी दुचाकी वाहनांच्या पार्किंगचे दर दोन रुपये तर चारचाकी वाहनांचे १५ रुपये होते़ या वेळी पहिल्यांदाच शहर व उपनगर अशी वर्गवारी करून नवीन दर लागू करण्यात आले आहेत़च्फोर्ट, हुतात्मा चौक, हॉर्निमोन सर्कल, बॉम्बे हॉस्पिटल लेन, चर्चगेट, जहाँगीर आर्ट गॅलरी, नरिमन पॉइंट, ताजमहल हॉटेल, दादर टीटी, जी़ बी़ मार्ग, गोरेगाव स्पोटर््स क्लब अशा ठिकाणी तीनचाकी व चारचाकी पार्किंग दर प्रतितासाला १५ वरून आता ६० रु. असेल. च्यात १ ते ३ पर्यंत ७५, ३ ते ६ पर्यंत १०५, ६ ते १२ पर्यंत १८० आणि रात्री १२ नंतर २१० रुपये दर आकारला जातील़ तर दुचाकीस हेच दर दुपारी १ वाजेपर्यंत १५, १ ते ३ पर्यंत ४५, ३ ते ६ पर्यंत ६०, ६ ते १२ पर्यंत ७५ आणि रात्री १२ नंतर ९० रुपये असेल.च्रिगेल सिनेम, पोलीस जिमखाना, नेपीयन्सी रोड, फेमस स्टुडिओ लेन, बी़ जी़ खेर मार्ग, न्यू प्रभादेवी रोड या ठिकाणी पार्किंगसाठी ४० रुपये़ यामध्ये तीनचाकी व चारचाकीसाठी १ ते ३ पर्यंत ५०, ३ ते ६ पर्यंत ७०, ६ ते १२ पर्यंत १२० आणि रात्री १२ नंतर १४० रुपये दर आकारण्यात येतील़ तर दुचाकीसाठी हेच दर दुपारी १ वाजेपर्यंत १०, १ ते ३ पर्यंत ३०, ३ ते ६ पर्यंत ४०, ६ ते १२ पर्यंत ५० आणि रात्री १२ नंतर ६० रुपये असणार आहेत़च्माझदा अपार्टमेंट, घाटकोपर, माहुल रोड शॉपर्स स्टॉपजवळ या ठिकाणी २० रुपये ताशी पार्किंगचे दर असणार आहेत़ तीन व चारचाकी वाहनांसाठी १ ते ३ पर्यंत २५, ३ ते ६ पर्यंत ३५, ६ ते १२ पर्यंत ६० आणि रात्री १२ नंतर ७० रुपये दर आकारले जातील़ तर दुचाकीसाठी १ वाजेपर्यंत पाच रुपये, १ ते ३ पर्यंत १५, ३ ते ६ पर्यंत २०, ६ ते १२ पर्यंत २५आणि रात्री १२ नंतर ३० रुपये असणार आहेत़च्फोर्ट, रिगल, कुलाबासारख्या गजबलेल्या विभागांमध्ये पार्किंगचे विद्यमान दर एक तासाचे २० रुपये आहेत़ नवीन दरांनुसार एका तासासाठी ६० रुपये मोजावे लागतील़ अशी ६२ ठिकाणं आहेत़महत्त्वाची व्यापारी संकुले, सरकारी, खासगी कार्यालयेवेळ चारचाकी दुचाकी१ तास ६० १५१ ते ३ तास ७५ ४५३ ते ६ तास १०५ ६०६ ते १२ तास १८० ७५१२ तासांनंतर २१० ९०व्यापारी क्षेत्र, कार्यालये१ तास ४० १०१ ते ३ तास ५० ३०३ ते ६ तास ७० ४०६ ते १२ तास १२० ५०१२ तासांनंतर १४० ६०निम्न व्यापारी क्षेत्र१ तास २०५१ ते ३ तास २५१५३ ते ६ तास ३५२०६ ते १२ तास् ६०२५१२ तासांनंतर ७०३०