मुंबईच्या राहुल भारद्वाजने पटकावला देशात विसावा क्रमांक

By admin | Published: June 12, 2017 03:02 AM2017-06-12T03:02:59+5:302017-06-12T03:02:59+5:30

आयआयटी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेचा आॅनलाइन निकाल रविवारी आयआयटी मद्रासतर्फे जाहीर करण्यात आला.

Mumbai's Rahul Bhardwaj has won the VISAVA number in the country | मुंबईच्या राहुल भारद्वाजने पटकावला देशात विसावा क्रमांक

मुंबईच्या राहुल भारद्वाजने पटकावला देशात विसावा क्रमांक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आयआयटी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेचा आॅनलाइन निकाल रविवारी आयआयटी मद्रासतर्फे जाहीर करण्यात आला. या निकालात पुण्याच्या अक्षत चुघ या विद्यार्थ्याने देशात दुसरा क्रमांक पटकावला आहे. तर मुंबईच्या राहुल भारद्वाज याने देशात २० वा क्रमांक पटकावला आहे.
राहुल भारद्वाज हा मुंबईच्या कुलाबा नेव्ही नगर येथे राहणारा आहे. राहुलचे वडील परमानंद भारद्वाज हे नेव्हीमध्ये आहेत. भारद्वाज परिवार आधी कोचीमध्ये राहत होता. वडिलांच्या बदलीनंतर ते मुंबईत स्थायिक झाले. राहुलने सांगितले की, नववीमध्ये असतानाच मी इंजिनीअर व्हायचे ठरवले. त्यानुसारच मी अभ्यासाची तयारी केली. माझे ध्येय ठरले असल्यामुळे मी नेहमीच त्या दिशेने वाटचाल केली. अकरावीपासून मी जेईईची तयारी सुरू केली होती. मी क्लासमध्ये अभ्यास करायचो, त्यानंतर घरी आल्यावरही अभ्यास करायचो. या काळात मी कुठल्याही समारंभाला गेलो नाही.
मला आयआयटी बॉम्बेमध्ये प्रवेश घ्यायचा आहे. कॉम्प्युटर सायन्सची मला आवड आहे. ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’मध्ये मला संशोधन करायचे आहे, असे राहुल याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. राहुलचे वडील परमानंद यांनी सांगितले की, राहुलने खूप मेहनत घेऊन हे यश संपादन केले आहे. माझी मुंबईला बदली झाल्यावर तो थोडासा नाराज झाला होता. अनेकदा बदली होत असल्यामुळे मुलांच्या मनावर परिणाम होतो. पण तरीही राहुलने कधीच अभ्यासावर परिणाम होऊ दिला नाही.

आईचा सिंहाचा वाटा
मी आज जे यश संपादन केले आहे, त्यात माझ्या आईचा सिंहाचा वाटा आहे. फक्त अभ्यासच नाही तर आईने आरोग्य आणि खेळ या दोहोंकडे लक्ष दिले. दिवसातले ६ तास मी अभ्यास करत होते. या अभ्यासात मला शिक्षकांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले. आयआयटी बॉम्बेमध्ये प्रवेश घेऊन कॉम्प्युटर सायन्स करायचे आहे. - रिया बाविस्कर, क्रमांक ११५
प्रत्येक क्षणाचे गणित
माझ्या अभ्यासाचे मी टाइम टेबल तयार केले होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ठरवलेल्या वेळातला एक मिनिटही फुकट न दवडता अभ्यास केला. सर्व विषयांना सारखे महत्त्व दिले. ‘अ‍ॅलेन’च्या सरांचे मार्गदर्शन मिळाल्याने माझा अभ्यास योग्य दिशेने सुरू झाला. ११ वीला असताना इलेक्ट्रीकल विषय होता. त्यात रुची निर्माण झाल्याने आता मला आयआयटी बॉम्बेमधून इलेक्ट्रीक इंजिनीअरिंग करायचे आहे.
- अमेय अंजारेळकर, क्रमांक१३२

रिक्षावाल्याच्या मुलाचे यश
ठाण्याच्या धनंजय तिवारी याने जेईई अ‍ॅडव्हान्समध्ये १,३६४ क्रमांक पटकावला आहे. धनंजयचे वडील हे रिक्षा चालवतात. आई-बाबा, एक भाऊ आणि बहीण असा धनंजयचा परिवार आहे. दहावीनंतरच धनंजय याने इंजिनीअरिंग करायचे ठरवले. मुलुंडच्या केळकर महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि त्याचवेळी जेईईची तयारी सुरू केली. दिवसातले ४ तास त्याने अभ्यास केला. आता त्याला आयआयटी बॉम्बेमधून मेकॅनिकल इंजिनीअरिंग करायचे आहे.

Web Title: Mumbai's Rahul Bhardwaj has won the VISAVA number in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.