मुंबईतील रस्त्यांचा फॉर्म्युला ठरला हिट; प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेत मिळणार स्थान 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 09:41 PM2022-02-17T21:41:50+5:302022-02-17T21:41:55+5:30

मुंबईतील रस्त्यांसाठी दरवर्षी कोट्यावधी रुपये खर्च केले जातात. सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी पालिकेने आतापर्यंत अनेक उपाययोजना केल्या आहेत.

Mumbai's road formula became a hit; Place to be found in Pradhan Mantri Gram Sadak Yojana | मुंबईतील रस्त्यांचा फॉर्म्युला ठरला हिट; प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेत मिळणार स्थान 

मुंबईतील रस्त्यांचा फॉर्म्युला ठरला हिट; प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेत मिळणार स्थान 

Next

मुंबई - मुंबई महापालिकेच्या अभियंत्याने विकसित केलेले अल्ट्रा थिन व्हाईट टॉपिंग हे तंत्रज्ञान देशात अव्वल ठरले आहे. हे तंत्रज्ञान प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेसाठी वापरले जाणार आहे. यापूर्वी गुजरात, चेन्नई आणि राजस्थान या राज्यांमध्येही हे तंत्रज्ञान वापरण्यात आले होते. तर आता बिहार आणि त्रिपुरा सरकारने याबाबत माहिती जाणून घेण्यासाठी पालिकेशी संपर्क साधला आहे.  

मुंबईतील रस्त्यांसाठी दरवर्षी कोट्यावधी रुपये खर्च केले जातात. सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी पालिकेने आतापर्यंत अनेक उपाययोजना केल्या आहेत. पालिकेचे कार्यकारी अभियंता डाॅ. विशाल ठोंबरे यांनी हे तंत्रज्ञान विकसित केले आहे. यामध्ये रस्त्याचा पाया डांबरी रस्त्याप्रमाणे बनवता येतो, तसेच वरील भाग काँक्रीटचा असतो. सन २०१० मध्ये ते आयआयटी मुंबईतून पीचडी करीत असताना ठोंबरे यांनी या तंत्रज्ञानावर शोध निबंध लिहिला. त्यानंतर पालिकेने यापद्धतीने रस्ते बनविण्यास सुरुवात केली. 

राष्ट्रीय ग्रामीण पायाभूत सुविधा विकास संस्थेच्या प्रतिनिधींनी पालिकेच्या प्रतिनिधींशी सोमवारी या तंत्रज्ञानाबाबत चर्चा केली. त्रिपुरा आणि बिहार राज्यात प्रधानमंत्री सडक योजनेअंतर्गत ग्रामीण भागात बांधल्या जाणाऱ्या रस्त्यांसाठी हे तंत्रज्ञान वापरले जाण्याची शक्यता आहे. यासाठी ठोंबरे स्वतः दिल्लीमध्ये जाऊन याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. यापूर्वी ठाणे, नागपूर, नाशिक या शहरांसह गुजरात, राजस्थान, चेन्नई या राज्यातही या तंत्रज्ञानांचा वापर करण्यात आला आहे.

Web Title: Mumbai's road formula became a hit; Place to be found in Pradhan Mantri Gram Sadak Yojana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.