Join us

फिफा विश्वचषकाचा अंतिम सामना पाहण्यापेक्षा पावसात मुंबईकरांची सुरक्षितता महत्त्वाची- महाडेश्वर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2018 9:52 PM

सध्या जगात रशियात सुरू असलेल्या फिफा फुटबॉल मॅचेसचे बघणे ही देशातील तमाम फुटबॉल प्रेमींमध्ये क्रेझ आहे.

- मनोहर कुंभेजकरमुंबई - सध्या जगात रशियात सुरू असलेल्या फिफा फुटबॉल मॅचेसचे बघणे ही देशातील तमाम फुटबॉल प्रेमींमध्ये क्रेझ आहे. अंतिम सामन्यात कोणते दोन संघ लढणार याबाबत त्यांना उत्सुकता आहे. त्यामुळे फिफा फुटबॉल अंतिम सामना पाहणे म्हणजे एक पर्वणीच आहे.फिफा फुटबॉल विश्वचषक मॅचचा अंतिम सामना बघण्यासाठी येत्या 14 जुलैला खास मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना रशियाच्या गव्हर्नरांनी आमंत्रित देखील केले होते. त्यानंतर रशियातील सेंट पिटर्सबर्ग येथे 17 ते 22 जुलै दरम्यान होणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेला देखील आपल्याला निमंत्रित केले होते, अशी माहिती महापौरांनी दिली.मुंबईत मुसळधार पावसाचे हवामान खात्याने दिलेले संकेत आणि सध्या मुंबईत पडत असलेला पाऊस बघता मुंबईकरांना पावसात त्रास होऊ नये यासाठी महापौरांनी अशा वेळी मुंबईत आपण असणे महत्त्वाचे मानून चक्क रशियाचा दौरच रद्द केला असल्याची माहिती महापौरांनी लोकमतशी बोलताना दिली. या आपल्या दौऱ्याला गटनेत्यांच्या बैठकीत मंजुरी देखील मिळाली होती. 12 ते 13 दिवस रशियाच्या दौऱ्यावर जाऊन ऐन पावसाच्या मोसमात मुंबईकरांना वाऱ्यावर सोडणे आपल्याला कदापि योग्य वाटले नाही. त्यामुळे आपण रशिया दौराच रद्द केल्याची माहिती महापौरांनी दिली.मुंबईच्या जनतेने सलग पाच वेळा शिवसेनेला निवडून देऊन मुंबई महापालिकेवर आपला भगवा फडकवला आहे. त्यामुळे गेल्या शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या नागपूरमध्ये पाऊस पडून नागपूरची तुंबापुरी होऊन नागपूरकरांचे अतोनात हाल झाले. मुंबईकरांच्या सुरक्षतेबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जागरूक असून शिवसेना कटिबद्ध आहे, असे महापौरांनी ठामपणे सांगितले.मुंबई ही सात बेटांनी बनली असून मुंबईत थोडा पाऊस पडला आणि त्यात समुद्राला भरती आल्यास मुंबईची भौगोलिक परिस्थिती पाहता मुंबई तुंबते ही वस्तुस्थिती आहे. आणि जर मुंबईत पाऊस पडून अतिवृष्टी झाल्यास मुंबईकरांचे नागपूरप्रमाणे हाल होऊ नये, त्यासाठी मुंबईचा महापौर म्हणून फिफा विश्वचषकापेक्षा मुंबईकरांची सुरक्षितता आपण महत्त्वाची मानतो, असे महापौरांनी सांगितले. आपण रशिया दौरा रद्द करत असल्याचे जनरल ऑफ दि रशियन फेडरेशनच्या कौन्सिलला कळवले असल्याची माहिती महापौरांनी दिली.

टॅग्स :मुंबई महानगरपालिका