Join us

मुंबईचे तापमान १६ अंशांच्या जवळ

By admin | Published: December 26, 2016 6:44 AM

गेल्या तीन आठवड्यांपासून मुंबईच्या किमान तापमानात सातत्याने चढउतार नोंदवण्यात येत आहे. किमान तापमान २४

मुंबई : गेल्या तीन आठवड्यांपासून मुंबईच्या किमान तापमानात सातत्याने चढउतार नोंदवण्यात येत आहे. किमान तापमान २४ अंशांवरून सात दिवसांत १६ अंशांच्या जवळ आले अहे. मात्र, त्यात सतत बदल होत असल्याने कधी थंडी, तर कधी उकाडा अशा वातावरणाचा सामना मुंबईकरांना करावा लागत आहे. भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मध्य-महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. कोकण-गोव्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदवण्यात आले आहे. मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या तीन आठवड्यापासून मुंबईच्या किमान तापमानात चढउतार आहेत. डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात किमान तापमान १६ अंश नोंदवले होते. तिसऱ्या आठवड्यात किमान तापमानाने २४ अंश तर चौथ्या आठवड्यात किमान तापमान पुन्हा १६ अंशावर खाली घसरले.(प्रतिनिधी)